हायकोर्टाने हुडकेश्वर पोलिसांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:46 PM2019-08-19T22:46:17+5:302019-08-19T22:48:32+5:30

एका आरोपीच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सरकारी वकिलाला सहकार्य न केल्यामुळे हुडकेश्वर पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला.

Hudkeshwar police scolded by high court | हायकोर्टाने हुडकेश्वर पोलिसांना फटकारले

हायकोर्टाने हुडकेश्वर पोलिसांना फटकारले

Next
ठळक मुद्देजामीन प्रकरण : वकिलाला सहकार्य केले नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : एका आरोपीच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सरकारी वकिलाला सहकार्य न केल्यामुळे हुडकेश्वर पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना फटकारले व त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला समन्स बजावून २१ ऑगस्ट रोजी न्यायालयात व्यक्तिश: हजर राहण्याचा आदेश दिला. तसेच, हुडकेश्वर पोलीस सरकारी वकिलांना सहकार्य का करीत नाही, याचे स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले.
रंजना आदमने या आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात उत्तर सादर करण्यासाठी सरकारी वकिलाने तपास अधिकाऱ्याशी वारंवार संपर्क साधला. परंतु, त्यांच्याकडून योग्य सहकार्य मिळाले नाही. ही बाब निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने गेल्या २३ जुलै रोजी आदमनेला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याच दिवशी सरकारी वकिलाने प्रकरणाची आवश्यक माहिती घेण्यासाठी तपास अधिकाऱ्याला बोलावून घेतले होते. परंतु, तपास अधिकाऱ्याने माहिती देण्यास सहकार्य केले नाही.

Web Title: Hudkeshwar police scolded by high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.