...तर देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:47 AM2019-01-16T00:47:58+5:302019-01-16T00:49:54+5:30

भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या चिंतनात असेल, तर त्याने देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल. कारण ज्याचे मन परमार्थस्वरुप झाले आहे, त्याला देवळात जाऊन फायदाही नाही, असा बोध हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनातून दिला.

If that is not gone to God's door, then it will work | ...तर देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल

...तर देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल

Next
ठळक मुद्देह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या चिंतनात असेल, तर त्याने देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल. कारण ज्याचे मन परमार्थस्वरुप झाले आहे, त्याला देवळात जाऊन फायदाही नाही, असा बोध हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनातून दिला.
सद्गुरू श्री धुंडामहाराज व मातोश्री कृष्णामाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पाचव्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशी हभप श्री चैतन्यमहाराज देगलूरकर, श्री क्षेत्र पंढरपूर यांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठातील अभंगावर विस्तृत विवेचन केले. सायंटिफिक सभागृहात सुरु असलेल्या प्रवचनमालेचे आयोजन एकनाथ चौधरी व मंदा चौधरी परिवारातर्फे करण्यात आले आहे. दुसºया दिवशी प्रवचनमालेच्या सुरुवातीला रूपाली व सचिन बक्षी यांनी अभंग गायले. प्रवचनाच्या सुरुवातीला महाराज म्हणाले की, हरीपाठ ज्ञानेश्वर महाराजांची विशेष रचना आहे. मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता त्यांनी हरीपाठ मांडला आहे. हरीपाठाला उपासनेचे आणि अभ्यासाचे मूल्य आहे. हरीपाठ ऐकताना त्यातून प्रकट झालेले प्रमेय, सद्उपदेश, वाच्यार्थ, लक्षार्थ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी त्यांनी हरीपाठातील पहिल्या अभंगाच्या ओवीचा विस्तृत पाठ मांडला. देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया..., महाराज म्हणाले की, ज्ञानेश्वर माऊलीच्या या ओवीतून मोक्षप्राप्तीचा ध्यास मानवाला दिला आहे. पण अनेकांना मोक्षच माहिती नाही. ते म्हणतात की दु:खाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. महाराज म्हणाले की मोक्ष प्राप्तीसाठी देवाचिया दारी क्षणभर उभे राहा. पण उभे राहताना शरीरानेच नाही तर मनात, चिंतनात आणि स्मरणात त्या भगवंताला ठेवा. तरच मोक्षाची प्राप्ती होऊ शकते.

Web Title: If that is not gone to God's door, then it will work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.