तू बोलली नाही तर आत्महत्या करेन : शाळकरी मुलीला अल्पवयीन प्रेमवीराची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:59 PM2019-01-07T22:59:58+5:302019-01-07T23:01:58+5:30

तू माझ्याशी फोनवर बोलली नाही, नियमित संपर्कात राहिली नाही तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी एका अल्पवयीन प्रेमवीराने १५ वर्षांच्या मुलीला दिली आहे. वारंवार समजावूनही तो ऐकत नसल्यामुळे शेवटी पीडित शाळकरी मुलीने आपल्या पालकांना आणि नंतर पोलिसांना हे प्रकरण सांगून विनयभंगाची तक्रार नोंदवली.

If you do not speak, I will commit suicide: schoolgirl threatens by minor lover | तू बोलली नाही तर आत्महत्या करेन : शाळकरी मुलीला अल्पवयीन प्रेमवीराची धमकी

तू बोलली नाही तर आत्महत्या करेन : शाळकरी मुलीला अल्पवयीन प्रेमवीराची धमकी

Next
ठळक मुद्देएकतर्फी प्रेमाचा असाही अट्टाहास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तू माझ्याशी फोनवर बोलली नाही, नियमित संपर्कात राहिली नाही तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी एका अल्पवयीन प्रेमवीराने १५ वर्षांच्या मुलीला दिली आहे. वारंवार समजावूनही तो ऐकत नसल्यामुळे शेवटी पीडित शाळकरी मुलीने आपल्या पालकांना आणि नंतर पोलिसांना हे प्रकरण सांगून विनयभंगाची तक्रार नोंदवली.
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलगी (वय १५) राहते. आरोपी तिचा नेहमी पाठलाग करायचा. तिच्याशी तो सलगी साधण्याचा प्रयत्न करायचा. २६ डिसेंबरपासून त्याने तिचा पिच्छाच पुरवणे सुरू केले. घरून शाळेत येण्या-जाण्यापासून तो तिच्या मागे मागे असायचा. तिच्याशी असभ्य वर्तनही करायचा. तिचा संपर्क क्रमांक मागून त्याने तिला सतत संपर्कात राहण्यास सांगितले. तिने नकार दिला असता ‘तू माझ्याशी फोनवर बोलली नाही तर आत्महत्या करेन, तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवीन’, अशी धमकीही दिली. त्याने कमी-जास्त केल्यास आपण नाहक अडचणीत येऊ, याची कल्पना आल्यामुळे अखेर रविवारी तिने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. पालकांनी मुलीला धंतोली ठाण्यात नेऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तपासात आरोपी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याला बालसुधारगृहात पाठविण्याची तयारी चालवली आहे.

Web Title: If you do not speak, I will commit suicide: schoolgirl threatens by minor lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.