नागपुरात महात्मा गांधींच्या प्रतिमांची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 01:26 AM2020-10-02T01:26:19+5:302020-10-02T01:28:39+5:30

शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महात्मा गांधीं यांचे पुतळे स्थापित करण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या देखभालीकडे महानगरपालिकेचे लक्ष नाही. यामुळेच या प्रतिमा आज दयनीय अवस्थेत दिसत आहेत.

Ignoring the images of Mahatma Gandhi in Nagpur | नागपुरात महात्मा गांधींच्या प्रतिमांची उपेक्षा

नागपुरात महात्मा गांधींच्या प्रतिमांची उपेक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देमहानगरपालिकेचे दुर्लक्ष : नगरसेवक आणि मनपाकडे माहिती देऊनही देखभालीची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महात्मा गांधीं यांचे पुतळे स्थापित करण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या देखभालीकडे महानगरपालिकेचे लक्ष नाही. यामुळेच या प्रतिमा आज दयनीय अवस्थेत दिसत आहेत. गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला 'लोकमत'ने शहरातील या पुतळ्यांच्या स्थितीचा आढावा घेतला असता अत्यंत वाईट परिस्थिती दिसून आली.
सदर चौकात महात्मा गांधींचा पुतळा आज जर्जर अवस्थेला आला आहे. पुतळ्याच्या काठीला भेग पडली आहे. रंग उडाला असून आता त्याच्या खिपल्याही निघत आहेत. या पुतळ्याच्या आजूबाजूला अघोषित पार्किंग स्थळ बनल्याने हातठेल्यांनी पुतळ्याला घेरले आहे. रेलिंगही तुटण्याच्या स्थितीत आले आहे. या पुतळ्याच्या परिसरात नागरिक कचरा फेकतात.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेकडे मागणी केल्यावर रेलिंगची आणि पुतळ्याची रंगरंगोटी केली होती. आता पुन्हा रंग उडाला. यासंदर्भात नगरसेवक आणि महानगरपालिकडे माहिती देऊनही कोणी लक्ष द्यायला तयार नाही.
वाईट बोलू नका, वाईट पाहू नका आणि वाईट ऐकू नका असा संदेश देणाऱ्या तीन माकडांच्या प्रतिमा अमरावती रोडवरील भरतनगर येथे लावण्यात आल्या आहेत. त्यांची स्थितीही आता खराब झाली आहे. टाईल्स उखडले आहेत. प्रतिमांवर गवत उगवले आहे. तरीही महानगरपालिका प्रशासन बघायला तयार नाही.

Web Title: Ignoring the images of Mahatma Gandhi in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.