लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील १० झोन कार्यालयांतर्गत करण्यात आलेल्या इमारत सर्वेक्षणात ६९१ पैकी १५९ इमारतींमध्ये अवैध बांधकाम करण्यात आले असून, मंजूर नकाशानुसार पार्किंगसाठी राखीव जागेवर करण्यात आलेले अवैध बांधकाम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली.विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली उच्च न्यायालयातील जनहित याचिका ६५/२०१२ अनुषंगाने शहरातील पार्किंगसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.शहरात धंतोली तसेच रामदासपेठ परिसरात खासगी रुग्णालयाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने धंतोली व रामदासपेठसह शहरातील १० झोनअंतर्गत विविध इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले.सर्वेक्षणात प्राप्त माहितीनुसार ६९१ इमारतींपैकी ४६५ इमारतींचे बांधकाम नियमानुसार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय १५९ इमारतींच्या पार्किंगसाठी आरक्षित जागेवर नियमबाह्य बांधकाम करण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत १५४ इमारतींच्या मालकांना नोटीस पाठवून अवैध बांधकाम काढण्यात आले आहे. याशिवाय ३९ अतिरिक्त इमारतींचे अवैध बांधकाम काढण्यात येणार आहे.धंतोली व रामदासपेठ परिसरातील रुग्णालयाची संख्या कमी करून परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहरात आॅरेंज सिटी मेडिकल हब तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.धंतोली परिसरात सिंगल लेन पार्किंगवाहतूक विभागाच्यावतीने धंतोली परिसरातील अनधिकृत बांधकाम असलेल्या दवाखान्यांचे शेड काढण्यात आले आहते. एकमार्गी वाहतूक, नो पार्किंग क्षेत्र निश्चित करून सिंगल लेन पार्किंग व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. यशवंत स्टेडियमसमोरील भागात त्रिकोणी मैदानात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.धंतोली येथील पार्किंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेच्यावतीने १४४७ वाहनांवर नो पार्किंग, ९४१ वाहनांवर टोर्इंग, १५१४ वाहनांना जामर लावणे, ९८४ वाहनांचे पिकअप, २३७० वाहनांवर एकमार्गी वाहतुकीची कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर शहरातील १५४ इमारतींचे अवैध बांधकाम काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:58 AM
शहरातील १० झोन कार्यालयांतर्गत करण्यात आलेल्या इमारत सर्वेक्षणात ६९१ पैकी १५९ इमारतींमध्ये अवैध बांधकाम करण्यात आले असून, मंजूर नकाशानुसार पार्किंगसाठी राखीव जागेवर करण्यात आलेले अवैध बांधकाम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली.
ठळक मुद्देपार्किंग समस्येबाबत आढावा