लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : पाेेलिसांनी उमरेड शहरातील अभ्यंकर चाैकात केलेल्या कारवाईमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून दारूच्या बाटल्या आणि दुचाकी असा एकूण ६७ हजार ४८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. ११) रात्री ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
खुशाल भाेंदू पवार (४०, रा. गरडेपार, ता. भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. उमरेड शहरातून देशी दारूची दुचाकीवर वाहतूक केली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी शहरातील अभ्यंकर चाैकातून एमएच-४०/बीझेड-२८९५ क्रमांकाच्या ज्युपिटरने जाणाऱ्या खुशालला थांबवून झडती घेतली.
त्याच्याकडे असलेल्या बाॅक्समध्ये पाेलिसांना देशी दारूच्या १४४ बाटल्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. शिवाय, त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीची ज्युपिटर आणि ७,४८८ रुपये किमतीची देशी दारू असा एकूण ६७ हजार ४८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी उमरेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली.