लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : पाेलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास ठाणा (ता. उमरेड) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे वाहन पकडले. यात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण ४ लाख ५३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक डाेर्लीकर यांनी दिली.
ठाणा शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या शिवाराची पाहणी केली. यात त्यांना एमएच-४०/बीएल-७८१९ क्रमांकाचे वाहन आढळून आले. पाेलिसांनी ते वाहन थांबवून झडती घेतली. त्यात रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच रेतीसह ट्रक जप्त केला.
या प्रकरणात वाहनचालक महेश हटवार, रा. पवनी, जिल्हा भंडारा व कार्तिक वंजारी, रा. भेंडाळा, ता. पवनी, जिल्हा भंडारा यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचे वाहन आणि ५३ हजार ३०० रुपये किमतीची ७०० घनफूट रेती असा एकूण ४ लाख ५३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी नायब तहसीलदार प्रदीप गाेपिनाथ वर्पे (३५, रा. उमरेड) यांच्या तक्रारीवरून भादंवि ३७९, ३४ तथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सहकलम ४८ (७)अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.