साऊंड व्यावसायिकांना डेसिबल वाढवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 08:36 PM2018-07-18T20:36:05+5:302018-07-18T20:37:36+5:30

पर्यावरणात आधीच ५५ ते ७० डेसिबल आवाज असून साऊंड व्यावसायिकांना दिलेल्या ५५ डेसिबलच्या आवाज मर्यादेचे पालन करून व्यवसाय करणे कठीण असून आवाजाची मर्यादा १३० डेसिबलपर्यंत वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी साऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन नागपूरच्यावतीने रविकांत पवनीपगार आणि चिंतेश्वर वंजारी यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Increase decibels to sound professionals | साऊंड व्यावसायिकांना डेसिबल वाढवून द्या

साऊंड व्यावसायिकांना डेसिबल वाढवून द्या

Next
ठळक मुद्देसाऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन नागपूरचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरणात आधीच ५५ ते ७० डेसिबल आवाज असून साऊंड व्यावसायिकांना दिलेल्या ५५ डेसिबलच्या आवाज मर्यादेचे पालन करून व्यवसाय करणे कठीण असून आवाजाची मर्यादा १३० डेसिबलपर्यंत वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी साऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन नागपूरच्यावतीने रविकांत पवनीपगार आणि चिंतेश्वर वंजारी यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा पोलिसांनी मॉरिस टी पॉईंट येथे अडविला. मोर्चात सहभागी साऊंड व्यावसायिकांनी आपल्या मागण्यांसाठी नारेबाजी केली. तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आणि काळे कपडे घालून साऊंड व्यावसायिकांनी शासनाच्या साऊंड व्यावसायिकांबद्दलच्या धोरणाचा निषेध केला.मोर्चात साऊंड सिस्टीम वाजविण्यासाठी त्या ठिकाणच्या पर्यावरणाच्या आवाजात १५ डेसिबल अतिरिक्त द्यावे, प्रशासनाला साऊंड सिस्टीमवर बंदी लावायची असल्यास साऊंड व्यावसायिक आणि कलाकारांची पर्यायी व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या. साऊंड सिस्टीमवर बंदी घातल्यास पोवाडे, भारुड, शास्त्रीय संगीत, गायन नृत्यकला यासारख्या प्राचीन कला लोप पावतील, असा इशाराही यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला. त्यानंतर रविकांत पवनीपगार, चिंतेश्वर वंजारी, सचिन काटे, भगवान भोईर, अनिल साळुंखे यांच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. गृहराज्यमंत्र्यांनी साऊंड व्यावसायिकांवर कारवाई होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे सांगून इतर मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व रविकांत पवनीपगार, चिंतेश्वर वंजारी कार्यकर्ते : सचिन काटे, भगवान भोईर, अनिल साळुंखे आदींनी केले.

Web Title: Increase decibels to sound professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.