लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान ४७ अंशावर गेले आहे. उकाड्यामुळे कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. यामुळे पाण्याची मागणी वाढल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात ४०एमएलडीने वाढ करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहराला दररोज ७१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे.नागपूर शहराला दररोज सरासरी ६४०एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. यातील २२० एमएलडी कन्हान नदीवरून तर उर्वरित पेंच येथून केला जातो. वाढती मागणी विचारात घेता एप्रिल महिन्यात ३० एमएलडी पाणीपुरवठा वाढविण्यात आल्याने ६७० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. मे महिन्यात यात पुन्हा ४० एमएलडीने वाढ करण्यात आली. आता ७१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली.महापालिका शहरात ३०२ टँकरव्दारे पाणीपुरवठा करीत आहे. यातील २२६ टँकर नेटवर्क नसलेल्या भागात आहेत. तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आॅरेंज सिटी वॉटर कंपनीचे शहरात ८२ टँकर आहेत. या टँकरच्या दिवसभरात २४०० फेºया होतात. काही नगरसेवकांची त्यांच्या प्रभागात टुल्लू पंपाचा वापर केल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. यात प्रामुख्याने सतरंजीपुरा, आसीनगर, लकडगंज व नेहरूनगर झोनचा समावेश होता. परंतु यावर पयांय म्हणून दिवसातून दोनदा पाणी सोडण्याला सुरुवात केली. त्यामुळे टुल्लू पंपाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला, असा दावा झलके यांनी केला.टँकरची संख्या घटलीदिवसातून दोनदा पाणीपुरवठा होत असल्याने टुल्लू पंपाचा वापर कमी झाला आहे. सोबतच टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मागील काही महिन्यात शहरातील जवळपास १५० टँकर कमी करण्यात आले आहे. यामुळे महापालिकेच्या खर्चात ९ ते १० कोटींची बचत झाली आहे.
नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात ४०एमएलडीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 7:41 PM
शहरातील तापमान ४७ अंशावर गेले आहे. उकाड्यामुळे कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. यामुळे पाण्याची मागणी वाढल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात ४०एमएलडीने वाढ करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहराला दररोज ७१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे.
ठळक मुद्देउन्हाळ्यामुळे मागणी वाढली : दररोज ७१० एमएलडी पाणीपुरवठा