स्वाइन फ्लूचा धोका वाढला; प्रतिबंधासाठी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 09:02 PM2022-08-04T21:02:19+5:302022-08-04T21:04:16+5:30

Nagpur News कोविड रुग्णांची संख्या वाढत असतानाच नागपूर शहरात इन्फल्यूएंझा किंवा स्वाइन फ्लू या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. हा धोका लक्षात घेता शहरात स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला राबविली जाणार आहे.

Increased risk of swine flu; Vaccination for prevention | स्वाइन फ्लूचा धोका वाढला; प्रतिबंधासाठी लसीकरण

स्वाइन फ्लूचा धोका वाढला; प्रतिबंधासाठी लसीकरण

Next
ठळक मुद्देनागपूरला ५ हजार इन्फल्यूएंझा डोस प्राप्त अतिजोखमीच्या व्यक्तींनाच लस मिळणार

 

नागपूर : कोविड रुग्णांची संख्या वाढत असतानाच नागपूर शहरात इन्फल्यूएंझा किंवा स्वाइन फ्लू या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. हा धोका लक्षात घेता शहरात स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला राबविली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालनालयाद्वारे नागपूरला ५ हजार इन्फल्यूएंझा डोस प्राप्त झाले आहेत. ही लस सध्या अतिजोखमीच्या व्यक्तींनाच दिली जाईल. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शहरात लसीकरण मोहीम राबणार असल्याची माहिती साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली आहे.

स्वाईन फ्लू बाधित चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये तिघे नागपूर शहरातील तर एक शहराबाहेरील आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू संरक्षणासाठी शासनाद्वारे प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरू करण्यात येत आहे. सुरुवातीला अतिजोखमीच्या व्यक्तींनाच लस दिली जाईल. यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणारे व्यक्ती, फ्लू रुग्णांची तपासणी, देखभाल आणि उपचारात सहभागी डॉक्टर्स, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांना इन्फल्यूएंझा लस दिली जाईल.

मनपाच्या केंद्रांवर इन्फल्यूएन्झा मोफत आहे. लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात इन्फल्यूएन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. याप्रकारे मिळालेली प्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते.

लसीकरणामुळे काही जणांना ताप, थकवा, ॲलर्जी, इंजेक्शनच्या जागी सूज येणे, अंग खाजविणे, डोकेदुखी, घाम येणे, स्नायू-सांध्यांमध्ये वेदना अथवा इतर प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्रास झाल्यास लसीकरण घेतलेल्या लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही मनपाने केले आहे. अधिक माहितीकरिता ९१७५४१४३५५ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

स्वाइन फ्लू टाळण्याकरिता हे करा

- हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा.

- गर्दीमध्ये जाणे टाळा.

-स्वाइन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा.

-खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा.

- भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी.

- पौष्टिक आहार घ्यावा.

हे करू नका

- हस्तांदोलन अथवा आलिंगन.

- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.

- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे.

Web Title: Increased risk of swine flu; Vaccination for prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.