लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेतर्फे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गांधीसागर उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार ॲड. अभिजित वंजारी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विशाल मुत्तेमवार, नगरसेविका हर्षला साबळे, गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर, पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, सहायक निरीक्षक पवार, मोतीराम खानजोडे, श्याम दंतुलवार, प्रकाश मोतेवार, प्रेरणा कदम, मीना भुते व विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.
समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. यात मधुकर बावणे, ज्येष्ठ समाजसेवी ताराबाई मेंडूले, दत्तात्रेय चौधरी, प्रवीण वायधने व सुषमा चौधरी आदींचा समावेश होता.