नागपुरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 08:19 PM2021-09-22T20:19:44+5:302021-09-22T20:20:23+5:30

Nagpur News नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) शहरातील तृतीयपंथीयासाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी जागा निश्चित करून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे.

Independent housing project for transgenders | नागपुरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प

नागपुरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प

Next
ठळक मुद्देएनएमआरडीए प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर प्रकल्प राबविणार


लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) शहरातील तृतीयपंथीयासाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी जागा निश्चित करून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. (Independent housing project for transgenders)

सरकारच्या योजनेतून उभारण्यात आलेल्या वसाहतीत तृतीयपंथीयांना घरे देण्याला स्थानिक नागरिकांचा विरोध होतो. त्यांची शहरातही स्वतंत्र अशी वसाहत नाही. याचा विचार करता एनएमआरडीए प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुर्बल घटकातील लाभार्थींना मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ तृतीयपंथीयांना मिळणार आहे. २०० ते २५० गाळ्यांचा प्रकल्प राबविण्याचा एनएमआरडीएचा मानस आहे. यामुळे तृतीयपंथीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

२ लाखांवर भूखंड नियमित करणार

गुंठेवारी अंतर्गत ऑक्टोबर २०२०पर्यंतचे ले-आऊट नियमित करण्यात येणार आहे. नागपूर महापालिका क्षेत्रातील दोन लाखांहून अधिक भूखंडधारकांना याचा लाभ मिळणार आहे. नासुप्रतर्फे नियमितीकरणाची प्रक्रिया राबवली जात आहे. यामुळे भूखंडधारकांना घरकुलासाठी बँकांकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

शुल्क भरणाऱ्यांना आरएल मिळणार

गुंठेवारी विभाग महापालिकेकडे असताना भूखंड नियमितीकरणासाठी शुल्क भरले परंतु आरएल मिळाले नाही, अशा प्लाॅटधारकांना आरएल दिले जाईल. तसेच ज्यांनी अर्ज केला पण शुुल्क भरले नाही, त्यांच्याकडून शुल्क वसूल करून आरएल दिले जाणार आहे. मात्र, नियमानुसार नियमितीकरण झाले नसले तर शुल्क भरले असले तरी आरएल मिळणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

१५० ते २०० तृतीयपंथीयांनी घरकुल योजना राबविण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासाठी आवश्यक शुल्क भरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार एनएमआरडीए लवकरच जागा निश्चित करून हा प्रकल्प राबविणार आहे.

- मनोजकुमार सूर्यवंशी, नासुप्रचे सभापती व महानगर आयुक्त

Web Title: Independent housing project for transgenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.