इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:18 AM2018-03-14T00:18:25+5:302018-03-14T00:18:40+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान-६३६ ‘कमी लोड’ कारणामुळे मंगळवारी रात्री ७ वाजता दिल्लीला उड्डाण भरू शकले नाही. याशिवाय अन्य ठिकाणांहून नागपुरात पोहोचणारी पाच विमाने उशिरा आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

IndiGo's Nagpur-Delhi flight canceled | इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान रद्द

इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान रद्द

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘कमी लोड’ कारण : पाच विमाने उशिरा पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान-६३६ ‘कमी लोड’ कारणामुळे मंगळवारी रात्री ७ वाजता दिल्लीला उड्डाण भरू शकले नाही. याशिवाय अन्य ठिकाणांहून नागपुरात पोहोचणारी पाच विमाने उशिरा आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
जेट एअरवेजचे सकाळी १०.२० वाजता मुंबईहून नागपुरात येणारे विमान तब्बल १.३५ मिनिटे उशिरा पोहोचले. इंडिगोचे दुपारी ३ वाजता नागपुरात येणारे कोलकाता-नागपूर विमान दोन तास उशिरा आले. गो-एअरचे मुंबई-नागपूर विमान रात्री ८.३० ऐवजी एक तास उशिराने अर्थात ९.३० वाजता, शिवाय गो-एअरचे पुणे-नागपूर विमान रात्री ८.५० ऐवजी रात्री १० वाजता आणि एअर इंडियाचे मुंबई-नागपूर विमान रात्री ९.२० ऐवजी ५५ मिनिटे उशिरा नागपुरात पोहोचले.

Web Title: IndiGo's Nagpur-Delhi flight canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.