विदर्भ-मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा मिळणार : संजीव कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:21 PM2019-04-25T22:21:32+5:302019-04-25T22:23:47+5:30

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. याप्रसंगी औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची ग्वाही संजीव कुमार यांनी दिली. वीजखरेदी किंमत कमी केल्याबद्दल यावेळी औद्योगिक ग्राहकांच्यावतीने संजीव कुमार यांचे अभिनंदन करण्यात आले.

Industrial consumers in Vidarbha-Marathwada will get the best service: Sanjeev Kumar | विदर्भ-मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा मिळणार : संजीव कुमार

विदर्भ-मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा मिळणार : संजीव कुमार

Next
ठळक मुद्देऔद्योगिक ग्राहकांशी साधला थेट संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. याप्रसंगी औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची ग्वाही संजीव कुमार यांनी दिली. वीजखरेदी किंमत कमी केल्याबद्दल यावेळी औद्योगिक ग्राहकांच्यावतीने संजीव कुमार यांचे अभिनंदन करण्यात आले.
महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांना नेहमीच उत्कृष्ट सेवा देण्यात येते. तसेच या सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी महावितरणकडून नेहमीच प्रयत्न करण्यात येतात, असे स्पष्ट करून औद्योगिक ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचा अर्ज आॅनलाईनद्वारेच करावा, असे आवाहन संजीव कुमार यांनी यावेळी केले. औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे अधिक नियोजनबद्धपणे व सातत्याने करावी. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच प्रादेशिक संचालकांनी औद्योगिक ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यासोबत प्रत्येक महिन्यात बैठकीद्वारे संवाद साधावा, असे निर्देशही संजीव कुमार यांनी दिले. यावेळी औद्योगिक ग्राहकांतर्फे करण्यात आलेल्या विविध सूचनांची दखल घेण्यात येईल, असे संजीव कुमार यांनी सांगितले.
विदर्भ प्रादेशिक विभागामधील नागपूर, बुटीबोरी, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, अकोला, खामगाव, मूर्तिजापूर, मूल इत्यादी तसेच मराठवाडा प्रादेशिक विभागामधील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे आणि बीड इत्यादी औद्योगिक ग्राहक प्रतिनिधींनी या संवादात सहभाग नोंदविला. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या थेट संवादात संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Industrial consumers in Vidarbha-Marathwada will get the best service: Sanjeev Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.