रक्तादानासाठी औद्योगिक क्षेत्राचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:32+5:302021-07-12T04:07:32+5:30
- आज बुटीबोरी व कळमेश्वर येथे रक्तदान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत सोमवारी ...
- आज बुटीबोरी व कळमेश्वर येथे रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत सोमवारी १२ जुलै रोजी रक्तदानासाठी औद्योगिक क्षेत्राने पुढाकार घेतला आहे. सोमवारी बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन झाले आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लोकमतने केले आहे.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
शिबिराचे आयोजन सकाळी १० ते दुपारी ४ वाजतापर्यंत बीएमए हॉल, फायर स्टेशन जवळ, एमआयडीसी, बुटीबोरी येथे होणार असून, उद्घाटन बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांच्या हस्ते होईल. यावेळी खा. कृपाल तुमाने शिबिराला भेट देतील. शिबिरासाठी नितीन गुज्जलवार, शशिकांत कोठारकर, शशीन अग्रवाल, युवराज व्यास, रवी सिंह परिश्रम घेत आहेत.
कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशन
शिबिराचे आयोजन सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत प्लाॅट क्रमांक पी-६, एमआयडीसी, कळमेश्वर येथे होणार आहे. उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते यांच्या हस्ते होईल. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक व कामगार उपस्थित राहतील.
............