लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांचे दागिने हिसकावून पळ काढणारा कुख्यात गुन्हेगार अनिल मंगलानी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. त्याला अटक करून त्याच्याकडून सोनसाखळी हिसकावून घेण्याचे १० गुन्हे पोलिसांनी वदवून घेतले. पाच लाखांचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे. मंगलानी गेल्या अनेक वर्षांपासून चोरी, घरफोडी आणि लुटमारीच्या गुन्ह्यात सहभागी आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आज पत्रकारांना दिली. यावेळी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संजीव कांबळे आणि पोलीस निरीक्षक आचल मुदगल उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून प्रतापनगर, बजाजनगर, सोनेगाव परिसरात पुन्हा सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी जुन्या चेनस्नॅचरकडे नजर वळविली. सीसीटीव्हीत उपरोक्त गुन्ह्यात पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा वापरण्यात आल्याने लक्ष मंगलानीकडे वेधले गेले. मंगलानीविरुद्ध तब्बल ३३ गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्याकडे पांढरी अॅक्टिव्हा असल्याने तसेच तो सराईत गुन्हेगार असल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्यावर नजर रोखली. त्याची हालचाल संशयास्पद वाटत असल्याने तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्रारंभी कबुली देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंगलानीने पोलिसांच्या बाजीरावपुढे हात टेकत तब्बल १० गुन्ह्यांची कबुली दिली. अवघ्या दीड महिन्यात त्याने हे गुन्हे केल्याचे पोलिसांना सांगितले. धंतोली, सोनेगाव, बजाजनगर, प्रतापनगर, पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या या गुन्ह्यांपैकी पोलिसांनी मंगलानीकडून गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा आणि ४ लाख ९० हजार रुपये किमतीचे १४६ ग्राम सोन्याचे दागिने जप्त केल्याचेही उपायुक्त कदम यांनी सांगितले. ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक जितेंद्र बोबडे, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, राजकुमार त्रिपाठी, हवालदार रवींद्र गावंडे, प्रकाश वानखडे, विजय लेकुरवाळे, नायक सतीश पांडे, महेश कुरसंगे, बलजित ठाकूर, सैयद वहीद, श्याम गोरले, अश्विन पिल्लेवान यांनी बजावली.पानटपरी, सोने आणि एमडीकुख्यात अनिल मंगलानी खामल्यातील घरून चेनस्नॅचिंग करण्यासाठी बाहेर पडताना तो त्याच्या अॅक्टिव्हाची मागची नंबर प्लेट वाकडी करायचा. त्यामुळे सीसीटीव्हीत त्याच्या दुचाकीचा क्रमांक नीट येत नव्हता. गुन्हा केल्यानंतर लगेच खामल्यातील घरी जायचा. त्याच्या वडिलाची खामला चौकात पानटपरी आहे. तो पानटपरीवर बसून राहायचा. त्याला एमडी या अमली पदार्थाचे व्यसन असल्याचेही पोलीस सांगतात. रात्री ११ नंतर मंगलानीच्या पानटपरीच्या आजूबाजूला गुन्हेगारांची, मादक पदार्थ तस्करी करणाऱ्याची नेहमी गर्दी बघायला मिळते.
नागपूरच्या खामल्यातील कुख्यात चेनस्नॅचर मंगलानी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:32 AM
महिलांचे दागिने हिसकावून पळ काढणारा कुख्यात गुन्हेगार अनिल मंगलानी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. त्याला अटक करून त्याच्याकडून सोनसाखळी हिसकावून घेण्याचे १० गुन्हे पोलिसांनी वदवून घेतले. पाच लाखांचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे. मंगलानी गेल्या अनेक वर्षांपासून चोरी, घरफोडी आणि लुटमारीच्या गुन्ह्यात सहभागी आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आज पत्रकारांना दिली.
ठळक मुद्देदीड महिन्यात १० गुन्हे : पाच लाखांचे दागिने जप्त