कुख्यात गुंडाचा खून

By admin | Published: May 11, 2017 02:32 AM2017-05-11T02:32:09+5:302017-05-11T02:32:09+5:30

यशोधरानगर येथे गुन्हेगारांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात दिवसाढवळ्या एका प्रतिस्पर्धी गुंडाचा रस्त्यावरच खून करण्यात आला.

The infamous punk murder | कुख्यात गुंडाचा खून

कुख्यात गुंडाचा खून

Next

यशोधरानगरात टोळीयुद्ध : नागरिकांमध्ये भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशोधरानगर येथे गुन्हेगारांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात दिवसाढवळ्या एका प्रतिस्पर्धी गुंडाचा रस्त्यावरच खून करण्यात आला. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. प्रवीण शंकर लांजेवार (२५) रा. कुंदनलाल गुप्तानगर असे मृताचे नाव आहे. आठवडाभरात खुनाची ही चौथी घटना घडल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून ते स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत.
खुनाची ही ताजी घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतील विटाभट्टी परिसरातील शितला माता चौकात घडली. मृत प्रवीण लांजेवार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने १९ डिसेंबर २०१६ रोजी आपल्या साथीदाराच्या मदतीने पाचपावली येथे रवि सातपैसे नावाच्या गुंडाचा खून केला होता. उत्तर नागपुरात चालत असलेल्या खंडणी वसुलीसाठी हा खून करण्यात आला होता. पाचपावली पोलीस यात अपयशी ठरल्याने आरोपी थोड्या दिवसातच जामिनावर सुटले होते. ११ एप्रिल रोजी प्रवीण तुरुंगातून जामिनावर सुटला. बाहेर आल्यानंतर प्रवीण उत्तर नागपुरात आपला दबदबा बनवण्याची तयारी करीत होता. त्यामुळे परिसरातील गुन्हेगार शेर खान, बाबू आणि त्यांच्या साथीदारासोबत त्याचा वाद सुरू होता. त्यांच्यात काही दिवसांपासून टोळीयुद्ध भडकले होते. प्रवीणची गुन्हेगारांमध्ये चलती असल्याने शेर खान व बाबूने त्याला संपवण्याचा निश्चय केला.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी चर्चा करण्याच्या बहाण्याने बुधवारी दुपारी ३.३० वाजता प्रवीणला शितला माता मंदिराजवळ बोलावले. तिथे तो येताच त्याला घेरले, शस्त्रांनी त्याच्या शरीरावर वार करून त्याला जागीच संपविले. घटनेच्यावेळी चौकात खूप वर्दळ होती.
अनेक लोकांनी खून होताचा पाहिला. परंतु गुंडांजवळ शस्त्र असल्याने कुणीही समोर येण्याची हिंमत दाखवू शकले नाही.

Web Title: The infamous punk murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.