शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये प्रचंड घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:11 PM2018-06-02T22:11:59+5:302018-06-02T22:12:23+5:30

जिल्हा परिषदेच्या २२५५ शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. परंतु या बदल्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाबाबत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत.

Intra districts teachers transfers, there is huge rift | शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये प्रचंड घोळ

शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये प्रचंड घोळ

Next
ठळक मुद्देपती-पत्नी एकत्रीकरणा ऐवजी विभक्तीकरण : जि.प. प्रशासनाकडे तक्रारींचा खच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या २२५५ शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. परंतु या बदल्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाबाबत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत.
अनेक शिक्षकांचे पती-पत्नी एकत्रीकरण न होता उलट विभक्तीकरण झाले आहे. एकत्रीकरणाच्या नावावर पती-पत्नीपैकी एकाची त्यांचे जोडीदाराचे शाळेच्या ३० किलोमीटरच्या आत बदली करण्यात आली तर त्याचवेळी दुसऱ्याची मात्र असलेल्या शाळेमधून इतरत्र बदली करण्यात आली किंवा विस्थापित करण्यात आले. अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांना ज्या शाळांमध्ये बदली मिळाली नाही त्याच शाळेत त्यापेक्षा सेवाकनिष्ठ व त्याच संवर्गातील शिक्षकांना मात्र बदली मिळाली आहे. तर दुसरीकडे बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर संवर्ग एकमधील काही बोगस बदलीपात्र शिक्षकांनी जवळच्या शाळा मिळवल्या. त्यामुळे अशा बोगस बदली लाभार्थींच्या विरोधात अनेक शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या आहेत. एवढेच नव्हे तर बदलीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने झालेल्या अन्यायाबद्दल मागील दोन दिवसात जि.प.प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या आहेत. या सर्व तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्यात यावी व बदली अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्यात यावा. तसेच खोटी माहिती देणाºयांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता विस्थापित व अन्यायग्रस्त शिक्षकांकडून होऊ लागली आहे.
याबाबत नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांचे नेत्रृत्वातील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांची भेट घेऊन चर्चा केली. या सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन अन्यायग्रस्त व विस्थापित शिक्षकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळात लीलाधर ठाकरे, सुनील पेटकर, सुधाकर मते, मुरलीधर काळमेघ, चंद्रकांत मेश्राम, अनिल नासरे, शंकर येनुरकर, मोहन जुमडे आदी पदाधिकारी सहभागी होते.
 हिंदी माध्यमांच्या शाळांवर मराठी शिक्षकांची बदली
अनेक शिक्षकांची अर्ज करूनही बदली करण्यात नाही तर अर्ज न करताही अनेक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिक्षकांना बदलीने पदस्थापना दिल्या गेल्या तर हिंदी माध्यमाचे शिक्षक मात्र विस्थापित करण्यात आले.

Web Title: Intra districts teachers transfers, there is huge rift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.