संजय राऊत यांच्या आरोपांची ईओडब्ल्यूमार्फत चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 07:00 PM2022-02-15T19:00:20+5:302022-02-15T19:06:17+5:30

Nagpur News शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Investigate Raut's allegations through EOW | संजय राऊत यांच्या आरोपांची ईओडब्ल्यूमार्फत चौकशी करा

संजय राऊत यांच्या आरोपांची ईओडब्ल्यूमार्फत चौकशी करा

Next
ठळक मुद्देईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे कुणाला दिले ?

नागपूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आरोपांची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले, संजय राऊत यांच्या पाठीशी आम्ही आहोत. ईडीने मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठविले का, असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. हे सर्व पेपर राऊत केंद्र सरकारला देणार आहेत. त्याची चौकशीही केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकार पडणार नाही

- केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे षडयंत्र सुरू आहे. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयएच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कारवायांमधून हे दिसून आले आहे. मात्र, आम्ही सर्व एकत्र आहोत. सरकार पडणार नाही, असा दावाही पटोले यांनी केला.

फडणवीस यांच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी करा

- फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोपही राऊत यांनी केले आहेत. भाजपच्या एका माजी मंत्र्याने मुलीच्या लग्नात नऊ कोटींचे कार्पेट अंथरल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. फडणवीस सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचे काँग्रेसने वारंवार सांगितले होते. पण फडणवीस यांनी कारवाई न करता सगळ्या घोटाळेबाजांना क्लीन चिट दिल्या होत्या. आता मविआ सरकारने या घोटाळ्यांचीसुद्धा चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

Web Title: Investigate Raut's allegations through EOW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.