जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर विमान २.१७ तास उशिरा पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:17 AM2018-11-17T00:17:30+5:302018-11-17T00:18:20+5:30
जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर (९डब्ल्यू६५७) या विमानाच्या वैमानिकाने कामाची वेळ संपल्याचे कारण सांगून विमानाचे उड्डाण करण्यास नकार दिल्यामुळे हे विमान नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ तास १७ मिनिटे उशिरा पोहोचले. वैमानिकांच्या भूमिकेचा प्रवाशांनी निषेध करीत कंपनीच्या विमानसेवेवर रोष व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर (९डब्ल्यू६५७) या विमानाच्या वैमानिकाने कामाची वेळ संपल्याचे कारण सांगून विमानाचे उड्डाण करण्यास नकार दिल्यामुळे हे विमान नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ तास १७ मिनिटे उशिरा पोहोचले. वैमानिकांच्या भूमिकेचा प्रवाशांनी निषेध करीत कंपनीच्या विमानसेवेवर रोष व्यक्त केला.
जेट एअरवेजचे हे विमान निर्धारित वेळेनुसार नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी २.३५ वाजता उड्डाण भरते आणि नागपुरात सायंकाळी ४.२० वाजता पोहोचते. पण वैमानिकांनी उड्डाण भरण्यास नकार दिल्यामुळे विमान उशिरा उडाले आणि नागपुरात सायंकाळी ६.३७ वाजता अर्थात २.१७ मिनिटे उशिरा पोहोचले. नवी दिल्लीत विमानाच्या उड्डाणास उशीर होत असल्याचे कळताच प्रवाशांनी विमानात गोंधळ घातला. कंपनीने प्रवाशांना समजविण्यासाठी नाश्ताचे कुपन देऊन कॅन्टिनमध्ये पाठविले. त्या दरम्यान स्थिती पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांना सायंकाळी ४.५० वाजता विमानात बसविण्यात आले. विमान नागपुरात आल्यानंतर प्रवासी शांत होते. दिल्लीत दिवसभर दृश्यता कमी असल्यामुळे सर्वच विमानांच्या उड्डाणांना काही मिनिटे उशीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.