ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञानस्त्रोत केंद्राचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 04:21 PM2021-01-15T16:21:23+5:302021-01-15T16:21:57+5:30
Nagpur News : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी रामटेक येथील कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयामध्ये ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञानस्त्रोत केंद्राचे लोकार्पण झाले.
रामटेक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी रामटेक येथील कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयामध्ये ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञानस्त्रोत केंद्राचे लोकार्पण झाले. यावेळी कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो.श्रीनिवास वरखेडी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
संस्कृत भाषेतील प्राचीन ज्ञान खजिन्याचे संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण करण्याचे दायित्व विश्वविद्यालयामार्फत पार पाडले जाते. यासाठी आवश्यक असणाऱ्या योग संशोधन व चिकित्सा केंद्राचे आज लोकार्पण झाले. महाराष्ट्र शासनाद्वारे यासाठी पाच कोटी तेरा लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला होता. या केंद्रामध्ये तळमजल्यावर ग्रंथालय, प्रकाशन विभाग, केंद्र संचालकाचे कार्यालय, तर पहिल्या माळ्यावर योग संशोधन व चिकित्सा केंद्र तसेच मुक्त व दूरस्थ केंद्र व अन्य वर्गखोल्या आहेत. भगवतगितेचे विधीवत पूजन करून आज या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.