जेमतेम महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कल्याणी यांचे लग्न झाले आणि पुढचे शिक्षणही सुटले. संसाराचे एक चाक ओढताना करिअरबाबतचा विचारही मागे पडला. मात्र काही काळ लाेटल्यानंतर स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी काहीतरी करण्याची उर्मी मनात कायम हाेती पण काय करावे, हा प्रश्न समाेर हाेता. बाहेर निघाल्याशिवाय काम मिळणेही शक्य नव्हते पण त्यांना घरी राहूनच काही करायचे हाेते. म्हणतात ना, मनात इच्छा असली की मार्ग निघताेच. एकदा माहेरी आली असताना ब्युटी पार्लरमध्ये गेल्या असता त्यांना मार्ग गवसला. आपण स्वत:चे पार्लर का टाकू नये, असा विचार मनात आला. सासरी आल्यावर त्यांनी पतीकडे इच्छा बाेलून दाखवली. त्यांनीही समर्थन दिले. पुढे कल्याणी यांनी रीतसर पार्लरचा काेर्स करून घेतला आणि स्वत:चा व्यवसाय सुरू झाला. या व्यवसायात काम करताना त्यांना आज १८ वर्षे झाली आहेत आणि चांगले यशही संपादन केले आहे. मागे वळून पाहताना त्यावेळी घेतलेल्या निर्णयाने स्वत:चे आकाश गाठल्याचे समाधान त्यांना आहे.
महिलांचे साैंदर्य खुलविणाऱ्या कल्याणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:08 AM