नागपुरातील कांबळे दुहेरी हत्याकांड : गुडिया शाहूला जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 08:03 PM2020-05-29T20:03:39+5:302020-05-29T20:05:20+5:30

उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी गुडिया शाहू हिचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.

Kamble double murder in Nagpur: Gudiya Shahu denied bail | नागपुरातील कांबळे दुहेरी हत्याकांड : गुडिया शाहूला जामीन नाकारला

नागपुरातील कांबळे दुहेरी हत्याकांड : गुडिया शाहूला जामीन नाकारला

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालय : सासूच्या आजारपणाचे दिले होते कारण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी गुडिया शाहू हिचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.
सासू घरात एकटीच असून ती आजारी आहे. तसेच, म्हातारपणामुळे तिला कोरोनाची लागन होण्याची भीती आहे. या काळात तिची काळजी घेता यावी याकरिता जामीन देण्यात यावा अशी विनंती गुडियाने केली होती. परंतु, गुन्ह्याची गंभीरता व अन्य विविध बाबी लक्षात घेता न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला. हा अर्ज गुडियाने कारागृह प्रशासनामार्फत दाखल केला होता. गुडियाचा किराणा दुकानदार पती गणेश रामबरण शाहू, रा. पवनपुत्रनगर, हुडकेश्वर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. भिसीच्या सात हजार रुपयांच्या वादातून आरोपींनी १८ फेब्रुवारी २०१८ रोजी उषा सेवकदास कांबळे (५४) व त्यांची दीड वर्षाची नात राशी या दोघींचा निर्घृण खून केला. त्यानंतर दोघींचेही मृतदेह पोत्यात भरून विहीरगावजवळील नाल्यात फेकून दिले. आरोपी गुडियाने जामीन मिळविण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु, कोणत्याही न्यायालयाने तिला सोडले नाही. तिने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. सरकारतर्फे अ‍ॅड. दीपिका गवळी यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Kamble double murder in Nagpur: Gudiya Shahu denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.