वकील संघटनेतर्फे कठुआ,उन्नाव घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:53 PM2018-04-16T23:53:50+5:302018-04-16T23:54:03+5:30
कठुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून, सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. सोमवारी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या गेटसमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या विधी विभागातर्फे देशात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात धरणे प्रदर्शन करून निषेध नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कठुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून, सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. सोमवारी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या गेटसमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या विधी विभागातर्फे देशात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात धरणे प्रदर्शन करून निषेध नोंदविण्यात आला.
प्रदेश काँग्रेस विधी विभागाचे अध्यक्ष अॅड. आसीफ कुरेशी यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश सचिव अॅड. अक्षय समर्थ, शहर विभागाचे अध्यक्ष अॅड. अभय रणदिवे, महाराष्ट्र विभागाचे अॅड. नफीस खान, अॅड. शादाब खान, अॅड. राजकुमारी राय, अॅड. रेखा बाराहाते यांनी केले. यावेळी महिला वकिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अत्याचारांच्या घटनांचा निषेध करीत सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. याशिवाय पीडितेची बाजू मांडणाऱ्या वकिलास धमकी देणाऱ्या जम्मू येथील वकील संघटनेचाही निषेध करण्यात आला. यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. आंदोलनात अॅड. प्रमोद उपाध्याय, अॅड. छायादेवी यादव, अॅड. कुलश्री भंगे, अॅड. गिरीश दादिलवार, अॅड. प्रभाकर भुरे, अॅड. श्याम शाहू, अॅड. कोकिळा लव्हात्रे, अॅड. रचना वासनिक, अॅड. अभय सुखदेव, अॅड. शेखर ढोक, अॅड. सुनीता पॉल, अॅड. रेचल राणी, अॅड. विलास तुमसरे, अॅड. रंजित सारडे, अॅड. वीरेंद्र रंगारी, अॅड. अमित बंड, अॅड. निकिता वाणी, अॅड. मनीषा सरोदे, अॅड. जयमाला लवाते, अॅड. ओ. यादव, अॅड. विलास राऊत, अॅड. मंगला वारके, अॅड. दिविशा दहिकर अॅड. सोनाली तेलंग, अॅड. मनोज मेंदुलकर, अॅड. मत्ता, अॅड. वासुदेव कापसे, अॅड. संदीप सहारे, अॅड. मोबीन खान, अॅड. विजय नारायणे, अॅड. छाया करोसिया, अॅड. जितेंद्र तिवारी, अॅड. सुरेश शिंदे, अॅड. पवन गभणे, अॅड. मनीष बडगे, अॅड. मिलिंद भोंगडे आदींचा सहभाग होता.