कुख्यात दीपक गौरकडून कट्टा, काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:19+5:302021-05-28T04:07:19+5:30

नागपूर : भाजीविक्रेत्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न करणारा कुख्यात गुंड दीपक गौर आणि पिस्तूल लॉक झाल्यामुळे गोळी बाहेर ...

Katta, cartridge confiscated from infamous Deepak Gaur | कुख्यात दीपक गौरकडून कट्टा, काडतूस जप्त

कुख्यात दीपक गौरकडून कट्टा, काडतूस जप्त

Next

नागपूर : भाजीविक्रेत्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न करणारा कुख्यात गुंड दीपक गौर आणि पिस्तूल लॉक झाल्यामुळे गोळी बाहेर पडली नाही. त्यामुळे भाजीविक्रेत्याचा जीव वाचला. रविवारी मध्यरात्री पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. संजय नाईक या दोघांकडून पोलिसांनी देशी कट्टा तसेच एक जिवंत काडतूस जप्त केले.

दीपक गौर (वय ३८) आणि संजय नाईक (३९) हे दोघेही कुख्यात गुंड असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाचपावलीतील महेंद्रनगरात राहणारे सुबोध शशिकांत वासनिक (३४) हे भाजी विक्रेता आहे. त्याचा धाकटा भाऊ आरोपी गौर आणि नाईक सोबत राहत असल्याचे सुबोधला माहीत पडल्यामुळे त्यांनी आपल्या धाकट्या भावाला समज दिली. ‘गौर आणि नाईक गुंड असून त्यांच्यासोबत तू राहू नको अन्यथा तुझ्यावर पोलीस कारवाई करतील,’ असे समजावून सांगितले. आरोपी गौर आणि नाईकला ते माहीत पडल्यामुळे रविवारी मध्यरात्री त्यांनी सुबोधला गाठले. मारहाण करून गौर याने सुबोधच्या छातीवर देशी पिस्तूल ठेवली आणि ट्रिगर दाबला. पिस्तूल लॉक झाल्यामुळे गोळी चालली नाही. त्यानंतर नाईकने लाकडी दांड्याने सुबोधला मारहाण केली. दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून संतप्त झालेली त्या भागातील मंडळी धावली. त्यांनी दोन्ही गुंडांना पकडून त्यांची धुलाई केली. पोलिसांनाही कळविले. पाचपावली पोलिसांनी आरोपींना हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल तसेच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

--

Web Title: Katta, cartridge confiscated from infamous Deepak Gaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.