साेयाबीनवर खाेडमाशी; तर संत्र्यावर ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:52+5:302021-07-31T04:08:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : तालुक्यातील बहुतांश भागात साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशी तर संत्रा बागांवर ब्राऊन रॉट या बुरशीजन्य राेगाचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : तालुक्यातील बहुतांश भागात साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशी तर संत्रा बागांवर ब्राऊन रॉट या बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञांसह कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी या राेगग्रस्त पिकांची पाहणी करून या कीड व राेगापासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे, तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके, मंडळ कृषी अधिकारी सागर अहिरे, कृषी सहायक ईशाग सुदामे, नचिकेत मलमकर यांनी पानवाडी (ता. काटाेल) शिवारातील बाबाराव कुमेरिया, राजेश मोहरिया, राजेश मोहरिया, शिवकुमार बासेवार, अंगद भैस्वार यांच्यासह मेंडकी व अन्य शिवारातील साेयाबीनचे पीक तसेच संत्रा व माेसंबीच्या बागांची बुधवार (दि. २८) व गुरुवारी (दि. २९) पाहणी केली.
ब्राऊन रॉट संत्रा व माेसंबी या लिंबूवर्गीय फळांवर येणारा बुरशीजन्य राेग आहे. दमट हवामान व पाण्याचा निचरा न झाल्याने या राेगाचा प्रादुर्भाव हाेताे व हा राेग झपाट्याने पसरताे. पावसाळ्याच्या उत्तरार्धात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात अधिक पाऊस झाल्यास या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाचा प्रसार हवेमार्फत होऊन झाडावरील फळे संक्रमित हाेतात. या ब्राऊन रॉटचे व्यवस्थापन प्रतिबंधावर अवलंबून असते. जमिनीपासून २४ इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर झाडाची छाटणी केल्याने या रोगाचे प्रमाण कमी करता येते, असेही कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना व त्यांच्या शंकांचे निरसन करताना सांगितले.
....
ही उपाययाेजना करा
सोयाबीनवरील खोडमाशीची अळी पिकाचे मुख्य खोड पोखरते. ती अळी १० ते १५ दिवस मुख्य खोडात राहत असल्याने झाडाची पाने पिवळी होतात. अन्नद्रव्य बरोबर न मिळाल्यामुळे झाड मलूल होते. या किडीपासून पीक वाचविण्यासाठी इथिओन (५० टक्के प्रवाही) किंवा इंडोक्झाकार्य (१५.८ टक्के प्रवाही, पिया क्लोरेंनिटिप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) या औषधांची फवारणी करावी, असा सल्ला कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप यांनी दिला.