नागपुरात सतरा वर्षीय मुलाचे अपहरण; कामठी रेल्वे स्थानक परिसरातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 10:45 AM2019-11-02T10:45:43+5:302019-11-02T10:46:09+5:30

कामठी रेल्वे स्थानक परिसरातून शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाले. आदेश नरेश शुक्ला असे अपहृत मुलाचे नाव आहे.

Kidnapping a seventeen-year-old boy; Incident in Kamthi train station area | नागपुरात सतरा वर्षीय मुलाचे अपहरण; कामठी रेल्वे स्थानक परिसरातील घटना 

नागपुरात सतरा वर्षीय मुलाचे अपहरण; कामठी रेल्वे स्थानक परिसरातील घटना 

Next
ठळक मुद्देअज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रेल्वे स्थानक परिसरातून शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाले. आदेश नरेश शुक्ला असे अपहृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदेशचे वडील नरेश शुक्ला हे मूळचे गोंदिया येथील रहिवासी आहे. गत १५ वर्षांपासून नवीन कामठी पोलीस ठाण्यात हद्दीतील लिहिगाव परिसरातील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. लिहिगावात भाड्याचे घर घेऊन कुटुंबासह वास्तव्याला आहेत. दिवाळीनिमित्त ते पत्नी विनिता व १७ वर्षांचा मुलगा आदेश याच्यासोबत गोंदिया येथे मूळ गावी गेले होते. शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास तिघेही गोंदियावरून महाराष्ट्र एक्स्प्रेसने कामठी रेल्वे स्थानकावर पोहोचले. पत्नी आणि मुलाला रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर थांबवून नरेश शुक्ला रेल्वे स्थानकावरील स्टॅण्डवर असलेली मोटार सायकल आणण्यासाठी गेले. तेवढ्यातच आदेश आईला सांगून नाश्ता करण्यासाठी पुढे गेला. मात्र बराच वेळ होऊन आदेश परत आला नसल्याने आई विनिता यांनी परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठेही गवसला नाही. यांनतर शुक्ला दाम्पत्याने रेल्वे स्थानक परिसर आणि नातेवाईकाकडे आदेशबाबत चौकशी केली. मात्र तो कुठेही मिळाला नाही. आदेश हा बारावीच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. तो खैरी नवेगाव, ता.पारशिवनी येथील वसतीगृहात राहतो. तिथेही त्यांच्या आई-वडिलांनी चौकशी केली. शेवटी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास नरेश शुक्ला यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून आदेशचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लिहिगावातील सुजल वासनिक या आठ वर्षीय मुलाचे १६ सप्टेंबर २०१७ रोजी अपहरण झाले होते. पोलिसांनी अद्यापही सुजलचा शोध लावण्यात यश आले नाही.

Web Title: Kidnapping a seventeen-year-old boy; Incident in Kamthi train station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.