पत्नीसह मुलाची हत्या : नागपूर जिल्ह्यातील घोटमुंढरी येथील थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 08:02 PM2018-12-04T20:02:18+5:302018-12-04T20:07:15+5:30

पहिल्या पत्नीने मुलासाठी पतीला त्याच्या मालकीच्या शेताचा हिस्सा मागितला. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने शांत डोक्याने पत्नीसह तरुण मुलाला शेतात नेले आणि दोघांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात एकाच खड्ड्यात पुरले. दोघांचीही हत्या दगडाने ठेचून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शिवाय, आरोपी पतीने समर्पण करून गुन्हा कबूल करीत घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. ही घटना अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खात नजीकच्या घोटमुंढरी शिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Killing of a son with wife: Terror at Ghotmundhari in Nagpur district | पत्नीसह मुलाची हत्या : नागपूर जिल्ह्यातील घोटमुंढरी येथील थरार

पत्नीसह मुलाची हत्या : नागपूर जिल्ह्यातील घोटमुंढरी येथील थरार

Next
ठळक मुद्देहत्येनंतर दोन्ही मृतदेह शेतात पुरले : शेतीच्या वाटणीवरून होता वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
 नागपूर (खात) : पहिल्या पत्नीने मुलासाठी पतीला त्याच्या मालकीच्या शेताचा हिस्सा मागितला. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने शांत डोक्याने पत्नीसह तरुण मुलाला शेतात नेले आणि दोघांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात एकाच खड्ड्यात पुरले. दोघांचीही हत्या दगडाने ठेचून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शिवाय, आरोपी पतीने समर्पण करून गुन्हा कबूल करीत घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. ही घटना अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खात नजीकच्या घोटमुंढरी शिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
लता अनिरुद्ध बावणे (३८) व धीरज अनिरुद्ध बावणे (१८) अशी मृत आई व मुलाची नावे असून, अनिरुद्ध बावणे, सर्व रा. घोटमुंढरी, ता. मौदा असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. लता व अनिरुद्ध एकाच गावचे असून, त्यांनी १९ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. धीरजच्या जन्मानंतर त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघेही वेगवेगळे राहू लागले. दरम्यान, अनिरुद्धने दुसरा विवाह केला. त्यामुळे लता तिचा मुलगा, आई व वडिलांसह काटोलला राहायला गेली. याच काळात त्यांचा वाद न्यायालयात पोहोचला. अनिरुद्ध तिला पोटगीही द्यायचा.
दोन वर्षांपूर्वी या पती - पत्नीमध्ये समेट झाला आणि दोघेही नागपूरला राहू लागले. धीरजही त्यांच्यासोबत होता. लताला तिच्या मुलासाठी अनिरुद्धच्या संपत्तीतील हिस्सा हवा होता. त्यामुळे तिने अनिरुद्धकडे शेतीसाठी तगादा लावला होता. अनिरुद्ध आधीच नागपूरहून घोटमुंढरीला पोहोचला. त्यानंतर लता व धीरज मंगळवारी (दि. २७) घोटमुंढरीला गेले. 

दोघांनाही त्याने सायंकाळी शेत पाहण्याच्या निमित्ताने शेतात बोलावले. तिथे त्याने दोघांचीही दगडाने ठेचून हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह शेतात खोल खड्डा खोदून त्यात पुरले. दरम्यान, लता व धीरज बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी भंडारा पोलीस ठाण्यात नोंदविली. याची कुणकुण अनिरुद्धला लागली. पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने सोमवारी मध्यरात्री अरोली पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
पोलिसांनी मंगळवारी सकाळी त्याच्या शेतातील खड्ड्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलूरकर यांनी घटनास्थची पाहणी केली. याप्रकरणी अनिरुद्धला भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.
पूर्वनियोजित कट 

विशेष म्हणजे, ज्या खड्ड्यात अनिरुद्धने दोन्ही मृतदेह पुरले होते, तेथे त्याने मीठ टाकले होते. त्यामुळे त्याचा हा पूर्वनियोजित कट असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. दुसरी बाब म्हणजे, धीरज व त्याची आई लता दोघेही तरुण आहेत. या दोघांना एका व्यक्तीने दगडाने ठेचून मारणे शक्य नाही. कारण त्याने पहिल्यांदा दोघांपैकी एकास मारायला सुरुवात करताच, दुसऱ्याने प्रतिकार केला असेल किंवा आरडाओरड तरी केली असती. त्यामुळे या कटात अन्य आरोपी सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Killing of a son with wife: Terror at Ghotmundhari in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.