नागपुरात रेल्वेपुलावरून खाली पडून मजूर दगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:56 PM2018-06-02T23:56:16+5:302018-06-02T23:56:27+5:30
रेल्वेपुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण मजुराचा करुण अंत झाला. अंकित निखील शिळू (वय २२) असे मृत मजुराचे नाव आहे. तो छिंदवाडा जिल्ह्यातील लिमाकोही खापा येथील रहिवासी होता. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी परिसरात रेल्वे पुलावर तो काम करीत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेपुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण मजुराचा करुण अंत झाला. अंकित निखील शिळू (वय २२) असे मृत मजुराचे नाव आहे. तो छिंदवाडा जिल्ह्यातील लिमाकोही खापा येथील रहिवासी होता. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी परिसरात रेल्वे पुलावर तो काम करीत होता. शुक्रवारी सायंकाळी तो पुलाखाली असलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात पडला. त्यामुळे गंभीर जखमी झाला. त्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. गरीब मजुरांना धोक्याच्या ठिकाणी कामावर जुंपणारे कंत्राटदार सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करीत नाही. त्यामुळे अंकितसारख्या मजुरांना जीव गमवावा लागतो. कोराडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपासात पोलीस काय करतात, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
तलावात आढळला मृतदेह
शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अंबाझरी तलावाच्या पाण्यात अंदाजे ४० ते ५० वर्षे वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळला. अग्निशमन दलाच्या मदतीने अंबाझरी पोलिसांनी तो बाहेर काढला. तो मृतदेह कुणाचा त्याचा पोलीस शोध घेत आहेत.