प्रयत्नशील राहून केशशिल्प मंडळ पुनर्स्थापित करू : श्याम आस्करकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:33+5:302021-09-08T04:13:33+5:30
नागपूर : नाभिक समाजाच्या सलून व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी सहायक असलेले राज्य केशशिल्प मंडळ पुनर्स्थापित करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष दत्ता ...
नागपूर : नाभिक समाजाच्या सलून व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी सहायक असलेले राज्य केशशिल्प मंडळ पुनर्स्थापित करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत. आपण ते लवकरच मिळवून राहू, असा निर्धार महाराष्ट्र नाभिक महामंडळ, विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर यांनी व्यक्त केला.
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी येथे संत सेनाजी महाराज पुण्यतिथी समारोहानिमित्त झालेल्या समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, जिल्हा उपाध्यक्ष व युवा आघाडी जिल्ह्याध्यक्ष राजू चिंचाळकर, मनाम एकता मंच जिल्ह्याध्यक्ष वैभव तुरक, महामंडळ जिल्हा सचिव विनेश कावळे, कार्यकारी सचिव विजय वालूकर आदी उपस्थित होते.
संत सेनाजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात करण्यात आली. कीर्तन, काला व महाप्रसादाचा लाभ समाजबांधवांनी व ग्रामस्थांनी घेतला.