मद्य परवाने आॅनलाईनच दिले जावेत  : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:24 PM2018-04-16T23:24:53+5:302018-04-16T23:25:04+5:30

उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे आॅनलाईनच देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

The liquor licenses should be given online only: Chandrashekhar Bawankule | मद्य परवाने आॅनलाईनच दिले जावेत  : चंद्रशेखर बावनकुळे

मद्य परवाने आॅनलाईनच दिले जावेत  : चंद्रशेखर बावनकुळे

Next
ठळक मुद्देद डिस्टिलर्स असो.आॅफ महाराष्ट्रशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे आॅनलाईनच देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
द डिस्टिलर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र या संघटनेसोबत झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. ही बैठक मुंबईत झाली. या विभागात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ‘इझी आॅफ डुर्इंग बिझनेस’ या सूत्राचा अवलंब केला जाणार आहे. यापुढे मद्य पॅकबंद बाटलीतच मिळावे, अशी मागणी या संघटनेकडून समोर आली. सार्वजनिक जागेत मद्य प्राशन करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सीएल-३ देशी दारूच्या दुकानात यापूर्वी खुली दारू उपलब्ध होत होती. त्यामुळे खुलेआम दारूचे सेवन केले जाते. खुल्या दारूमुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास रोखण्यासाठ़ी सीएल-३ परवानाधारक दुकानात व पॅकबंद बाटलीत विकण्यात यावी. सीएल-३ व एफएल-२ ही दुकाने सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतच सुरू राहतील असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
देशी दारूच्या रंगाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या देशी दारू पांढऱ्या  रंगात उपलब्ध आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार विदेशी दारूप्रमाणेच देशी दारूलाही रंग असावा. देशी दारूला रंग असला तर अवैध दारूवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी असोसिएशनला उत्पादन शुल्क मंत्र्यांनी ग्रामरक्षक दल गठित करणे व त्यास सहकार्य करण्याची सूचना केली. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल हा प्रभावी उपाय असून अवैध दारू निर्मिती कुठे होते याचा शोध घेऊन या व्यवसायाला आळा घालण्यासाठी सरपंचाच्या मदतीने ग्रामरक्षक दलास सहकार्य करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली.

Web Title: The liquor licenses should be given online only: Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर