लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज चोरीच्या प्रकरणात अडकू नये यासाठी ताजबाग परिसरातील लोकांनी नवी शक्कल शोधली आहे. काही वीज ग्राहकांनी वीज चोरी लपविण्यासाठी मीटरला आग लावली. त्यानंतर घराला कुलूप ठोकून बाहेर निघून गेल्याची धक्कादायक माहिती वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलने दिली.विशेष म्हणजे एसएनडीएलने गेल्या काही दिवसापासून वीज चोरी करणाऱ्यांच्या विरोधात ताजबाग परिसरात धडक मोहीम हाती घेतली आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जात आहे. कारवाईसाठी कंपनीने चार पथक गठित केले आहे. कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी कंपनीच्या पथकावर दगडफेक करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कारवाई थांबविलेली नाही. आतापर्यत या परिसरातील १०३ मीटरची तपासणी करण्यात आली आहे. यातील ९३ मीटरधारकांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसातच सुमारे ३८ लाख ४ हजारांची वीज चोरी पकडण्यात आली आहे.वीज चोरीच्या गुन्ह्यात अडकू नये यासाठी अनेक जण मीटरला आग लावत आहे. सुमारे ७० मीटला आग लावल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आहे. परंतु मीटरला आग लागल्याची कुणीही कंपनीकडे तक्रार केलेली नाही. तपासणी दरम्यान मीटरला आग लागलेली नाही तर लावण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. काही ग्राहक संभाव्य कारवाई टाळण्यासाठी गॅस कटरचा वापर करून मीटरमध्ये ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावत आहे. गेल्या दोन दिवसात असे २५ मीटर आढळून आले आसून ताजबाग परिसरात अनेकांच्या घरांना कुलूप असून नागरिक घर सोडून दुसरीकडे वास्तव्यास गेले आहेत.असे आहेत आग लावणारे संशयितमीटरला आग लावल्याचा ताजबाग येथील शिबू रेहान व मोमीनपुरा येथील निवासी छोटू व शकील यांच्यावर कंपनीचा संशय आहे. ते मीटरमध्ये छेडसाड करणाऱ्यांना मदत करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुराव्याच्या आधारे अशा लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी एसएनडीएलने केली आहे. मीटरमध्ये छेडसाड वा असे कृत्य करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नागपुरात मीटरला आग लावून घराला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:26 AM
वीज चोरीच्या प्रकरणात अडकू नये यासाठी ताजबाग परिसरातील लोकांनी नवी शक्कल शोधली आहे. काही वीज ग्राहकांनी वीज चोरी लपविण्यासाठी मीटरला आग लावली. त्यानंतर घराला कुलूप ठोकून बाहेर निघून गेल्याची धक्कादायक माहिती वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलने दिली.
ठळक मुद्देवीज चोरी लपविण्यासाठी नवी शक्कल