लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोहमार्ग पोलिसात कार्यरत असलेल्या एका शिपायाने लोहमार्ग पोलिसांच्या कार्यालयीन ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून स्व:तला एका खोलीत बंद करून घेतले. मेसेजमध्ये डायरी जमादारावर सुटी देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली.जयंत गायकवाड असे लोहमार्ग पोलीस शिपायाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुटी देण्यासाठी गायकवाड याने डायरी जमादार अनिल कुवर यांना विनंती केली. त्या कामासाठी कुवर यांनी मटणाची पार्टी आणि पैसे मागितले. त्यामुळे गायकवाड याला राग आला. त्याने सकाळी ११ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या जवळील आरएमएस इमारतीतील जीआरपीच्या बॅरेकमध्ये दरवाजा बंद करून कोंडून घेतले. त्यापूर्वी त्याने कार्यालयाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठविला. या मॅसेजमध्ये कुवर यांनी लाच मागितल्याचा उल्लेख त्याने केला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली. त्वरित गायकवाड याला बॅरेकच्या बाहेर काढण्यात आले.प्रकरणाचा तपास करू‘जयंत गायकवाड या शिपायाने व्हॉट्सअॅप ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून खोलीत कोंडून घेतले होते. त्याला खोलीतून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणाचा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानंतर दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.’-विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस
आत्महत्येचा मेसेज करून खोलीत करून घेतले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:17 AM
लोहमार्ग पोलिसात कार्यरत असलेल्या एका शिपायाने लोहमार्ग पोलिसांच्या कार्यालयीन ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून स्व:तला एका खोलीत बंद करून घेतले. मेसेजमध्ये डायरी जमादारावर सुटी देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली.
ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसाचे कृत्य : डायरी जमादारावर लाच मागितल्याचा आरोप