Lok Sabha Election 2019 : नागपुरात ३० तर रामटेकमध्ये १६ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 09:59 PM2019-03-28T21:59:29+5:302019-03-28T22:01:36+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूरमधून दोन तर रामटेकमधून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नागपूरमध्ये एकूण ३० उमेदवार तर रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूरमधून दोन तर रामटेकमधून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नागपूरमध्ये एकूण ३० उमेदवार तर रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवार शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. नागपूर लोकसभा मतदार संघातून दोघांनी अर्ज मागे घेतले. यात अ.करीम अब्दुल गफ्फार पटेल (एमआयएम) आणि रविकांत मेश्राम यांचा समावेश आहे. रामटेकमधून रणजित सफेलकर, प्रकाश टेंभुर्णे, ललिता शामकुवंर, सचिन शेंडे आणि गजानन जांभुळकर यांचा समावेश आहे.
असे आहेत उमेदवार ; नागपूर लोकसभा
१) नितीन जयराम गडकरी-भारतीय जनता पक्ष
२) नानाभाऊ फाल्गुनराव पटोले-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३) मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहीम शेख-बहुजन समाज पार्टी
४) सुरेश तातोबा माने-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
५) मनोहर ऊर्फ सागर पुंडलिकराव डबरासे-वंचित बहुजन आघाडी
६) साहील बालचंद्र्र तुरकर-भारतीय मानवाधिकारी फेडरल पार्टी
७) विठ्ठल नानाजी गायकवाड-हम भारतीय पार्टी,
८) विनोद काशीराम बडोले-अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टी
९) उदय रामभाऊ बोरकर-अपक्ष
१०) दीक्षिता आनंद टेंभुर्णे-देश जनहित पार्टी
११) सुनील सूर्यभान कवाडे-अपक्ष
१२) सचिन जागोराव पाटील-अपक्ष
१३) श्रीधर नारायण सावळे-राष्ट्रीय जनसंभावना पार्टी
१४) सिद्धार्थ आसाराम कुर्वे-भारतीय दलित पँथर
१५) सचिन हरिदास सोमकुअर-अपक्ष
१६) प्रफुल्ल माणिकचंद भांगे-अपक्ष
१७) सतीश विठ्ठल निखार-अपक्ष
१८) अली अशफाक अहमद-बहुजन मुक्ती पार्टी
१९) डॉ.मनीषा बांगर-पीपल पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
२०) गोपालकुमार गणेशू कश्यप-छत्तीसगड स्वाभिमान मंच
२१) असीम अली - मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी
२२) अॅड. उल्हास शालिकराम दुपारे-अपक्ष
२३) दीपक लक्ष्मणराव मस्के-अपक्ष
२४) मनोज कोटुजी बावने-अपक्ष
२५) प्रभाकर पुतनाजी सातपैसे-अपक्ष
२६) अॅड. विजया दिलीप बागडे-आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
२७) रुबेन्ट डोमोनिक फ्रान्सिक-अपक्ष
२८) कार्तिक गेंदालाल डोके-अपक्ष
२९) वनिता जितेंद्र राऊत-अखिल भारतीय मानवता पक्ष
३०) योगेश कृष्णराव ठाकरे -सीपीआय (एमएल) रेडस्टार.
एकूण अर्ज - ३९
छाननीमध्ये रद्द - ६
अर्ज मागे घेतले - ३
रिंगणात एकूण उमेदवार - ३०
रामटेक लोकसभा
१) कृपाल बालाजी तुमाने-शिवसेना
२) किशोर उत्तमराव गजभिये-इंडियन नॅशनल काँग्रस
३) सुभाष धर्मदास गजभिये-बहुजन समाज पार्टी
४) किरण प्रेमकुमार रोडगे-वंचित बहुजन आघाडी
५) अर्चना चंद्रकुमार उके-राष्ट्रीय जनसंभावना पार्टी
६) लक्ष्मण ज्योतिक कान्हेकर-पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
७) विनोद भिवाजी पाटील-आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
८) शैलेश संभाजी जनबंधू-सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया
९) नथ्थू माधव लोखंडे-अपक्ष
१०) सोनाली रवींद्र बागडे-अपक्ष
११) अनिल महादेव ढोणे-अपक्ष
१२) गौतम श्रीराम वासनिक-अपक्ष
१३) संदेश भिवराम भालेकर-बहुजन मुक्ती पार्टी
१४) कांतेश्वर खुशालजी तुमाने-अपक्ष
१५) कॉ. बंडू रामचंद्र मेश्राम-कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एमएल) रेडस्टार
१६) चंद्रभान बळीराम रामटेके-राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी
एकूण अर्ज-२४
छाननीमध्ये रद्द-३
अर्ज मागे घेतले-५
रिंगणात एकूण उमेदवार-१६