Lok Sabha Election 2019; ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’ ठरतेय प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:56 AM2019-03-29T10:56:13+5:302019-03-29T10:58:35+5:30

यंदा ऑनलाईन तक्रारी नोंदविण्यासाठी ‘सी-व्हिजिल अ‍ॅपह्ण तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदविता येत असून, संबंधिताचे नावही समोर येत नाही.

Lok Sabha Election 2019; The 'C-Visible App' is supposed to be effective | Lok Sabha Election 2019; ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’ ठरतेय प्रभावी

Lok Sabha Election 2019; ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’ ठरतेय प्रभावी

Next
ठळक मुद्दे ७२ तक्रारींपैकी ७१ निकालीप्रत्येक तक्रारीचे तत्काळ निवारण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंगाची अनेक प्रकरण होतात. नागरिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून त्याची दखलच घेतली जात नव्हती. अनेकजण तक्रारी नोंदविण्यास भीत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आले. त्यामुळे यंदा ऑनलाईन तक्रारी नोंदविण्यासाठी ‘सी-व्हिजिल अ‍ॅपह्ण तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदविता येत असून, संबंधिताचे नावही समोर येत नाही.
या अ‍ॅपच्या माध्यमातून आतापर्यंत ७२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यातील ७१ तक्रारींवर आवश्यक कारवाई करण्यात आली. त्यामुळे हे अ‍ॅप नागरिकांसह निवडणूक विभागासाठीही प्रभावी ठरले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी ‘सी-व्हिजिल अ‍ॅप उपलब्ध करून दिले असून, नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेले बॅनर व फ्लेक्स असल्याबाबत सी-व्हिजिल अ‍ॅपवरून ७२ तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी बॅनर, पोस्टरशी संबंधित आहेत.
आदर्श आचारसंहिता भंग होत आहे, असे नागरिकांना वाटत असल्याचे त्यांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशाप्रकारे आचारसंहितेसंदर्भातील घटना नोंदवू शकतात.
नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटात जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होते. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ही तक्रार पाठविण्यात येते. त्यानंतर जीव्हीआयजी, आयएल अन्वेषक या जीआयएस आधारित मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या साहाय्याने संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या पाच मिनिटात पोहोचणे अपेक्षित आहे.
संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास व तक्रारींच्या तथ्यांची तपासणी करून यासंबंधीचा अहवाल या अ‍ॅपद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठवला जातो.
एकूणच नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असून कारवाई सुद्धा होत असल्याने नागरिकांकडून या अ‍ॅपला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दुसरीकडे नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने निवडणूक विभागासाठीसुद्धा हे अ‍ॅप प्रभावी ठरत आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; The 'C-Visible App' is supposed to be effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.