परेशचा लोकमत परिवाराला अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:43 PM2018-06-08T22:43:55+5:302018-06-08T22:44:11+5:30

लोकमत परिवारातील सदस्य विनोद हंबर्डे यांचे चिरंजीव परेश याने ९५.२० टक्के गुण मिळविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परेशने यश मिळवल्याचे कळताच लोकमतचे कुटुंबप्रमुख माजी खासदार विजय दर्डा यांनी परेशला कार्यालयात बोलावून त्याचा गौरव केला. ‘बेटा तुझ्या यशाचा संपूर्ण लोकमत परिवाराला अभिमान आहे. भविष्यात आम्ही सर्व तुझ्या सोबत राहू’ या शब्दात दर्डा यांनी परेशला धीर दिला.

Lokmat family have proud to Paresh | परेशचा लोकमत परिवाराला अभिमान

परेशचा लोकमत परिवाराला अभिमान

Next
ठळक मुद्देविजय दर्डा यांनी केला गौरव


लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : लोकमत परिवारातील सदस्य विनोद हंबर्डे यांचे चिरंजीव परेश याने ९५.२० टक्के गुण मिळविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परेशने यश मिळवल्याचे कळताच लोकमतचे कुटुंबप्रमुख माजी खासदार विजय दर्डा यांनी परेशला कार्यालयात बोलावून त्याचा गौरव केला. ‘बेटा तुझ्या यशाचा संपूर्ण लोकमत परिवाराला अभिमान आहे. भविष्यात आम्ही सर्व तुझ्या सोबत राहू’ या शब्दात दर्डा यांनी परेशला धीर दिला.
सोमलवार निकालस शाळेचा विद्यार्थी असलेला परेश अतिशय मेहनती आहे. परेशची आईसुद्धा खासगी नोकरी करते. कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी दोघेही बाहेर असल्यामुळे परेशवर कुटुंबाचे विशेष असे लक्ष नव्हते. असे असतानाही त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. नियमित चार ते पाच तास अभ्यास त्याने केला. शाळेतून आणि खासगी शिकवणीतून त्याला बराच फायदा झाला. शाळेत झालेल्या टेस्ट सिरीजमुळे परीक्षेची संपूर्ण तयारी झाली होती. ९० टक्क्यावर गुण मिळतील अशी त्याला अपेक्षा होती. आज निकाल हाती आल्यावर त्याची अपेक्षापूर्ती झाली. परेशला भविष्यात इंजिनिअरींग करायचे आहे.

Web Title: Lokmat family have proud to Paresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.