लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘रेल्वेची रिफंड पद्धती कोरोना फ्रेंडली’ असे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित करताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. रिफंड पद्धतीसाठी तयार केलेले वेळापत्रक चुकीचे असल्याची आणि इतर बाबींवर या वृत्तातून टीका करण्यात आली होती. याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने रिफंडसाठी तयार केलेले वेळापत्रक रद्द करून आरक्षण खिडक्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत.मार्चमध्ये रेल्वेत लॉकडाऊन केल्यामुळे अनेक प्रवाशांनी केलेल्या आरक्षणाच्या तिकिटांचे पैसे अडकून पडले होते. त्यासाठी रेल्वेने सोमवारपासून तिकिटांची रक्कम परत करणे सुरु केले. परंतु ही रक्कम परत करण्यासाठी रेल्वेने तारखेनुसार वेळापत्रक तयार केले होते. हे वेळापत्रक माहीत नसल्यामुळे अनेक नागरिक आरक्षण कार्यालयात विचारणा करण्यासाठी येत होते. तिकीट परत करण्याची तारीख पुढे असल्याचे समजल्यानंतर ते रिकाम्या हाताने परत जात होते. यातच आरक्षण कार्यालयात मोजक्याच खिडक्या सुरु करण्यात आल्यामुळे नागरिकांची गर्दी होत होती. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकमत’ने बुधवारी ‘रेल्वेची रिफंड पद्धती कोरोना फ्रेंडली’ हे वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच रेल्वे प्रशासनाने तातडीने रिफंडसाठी तयार केलेले वेळापत्रक रद्द केले. याशिवाय ‘सोशल डिस्टन्सिंग’ होऊ नये यासाठी रेल्वेच्या आरक्षण खिडक्या वाढविण्याचे आदेश दिले. त्यानुसार अजनीच्या आरक्षण कार्यालयात आरक्षण खिडक्या २ वरून ६ तसेच नागपूर रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयात आरक्षण खिडक्या २ वरून ६ करण्यात आल्या आहेत. याशिवाय अजनी आरक्षण कार्यालयात निर्जंतुकीकरणासाठी २ सॅनिटायझर मशीन देण्यात आल्या असून प्रवाशांना सावलीत उभे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे नागरिकांची आरक्षण कार्यालयात गर्दी होणार नसून तिकीट खिडक्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांना लवकरच आपल्या तिकिटांची रक्कम परत मिळणार आहे.आरक्षण खिडक्या वाढविण्याचे आदेशआरक्षण कार्यालयात नागरिकांची अनावश्यक गर्दी होत असल्यामुळे रिफंडसाठी तयार करण्यात आलेले वेळापत्रक रद्द करण्यात आले असून आरक्षण खिडक्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजनी आरक्षण कार्यालयाला दोन सॅनिटायझर मशीन देण्यात आल्या आहेत.’एस. जी. राव. जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
‘लोकमत इम्पॅक्ट’ : ‘रिफंड’चे वेळापत्रक रद्द, आरक्षण काऊंटर वाढविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:06 AM
‘रेल्वेची रिफंड पद्धती कोरोना फ्रेंडली’ असे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित करताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. रिफंड पद्धतीसाठी तयार केलेले वेळापत्रक चुकीचे असल्याची आणि इतर बाबींवर या वृत्तातून टीका करण्यात आली होती. याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने रिफंडसाठी तयार केलेले वेळापत्रक रद्द करून आरक्षण खिडक्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्देअजनी कार्यालयात निर्जंतुकीकरणाची सुविधा