कळमेश्वर : राज्य शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) व कळमेश्वर पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने पंचायत समिती सभागृहात हरभऱ्यावरील घाटेअळी नियंत्रण प्रशिक्षण कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात घाटेअळीचे जीवनचक्र व तिच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययाेजनांबाबत माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमात उमेद गटातील महिला सदस्य सहभागी झाल्या हाेत्या. त्यांना ‘एचएएनपीव्ही’ची निर्मिती, त्याचा वापर, घाटेअळीचे जीवनचक्र यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात गटविकास अधिकारी संदीप गोडसलवार, कृषी अधिकारी प्रदीप टिंगरे, विस्तार अधिकारी (कृषी) दीपक जंगले, आत्माचे जांभूळकर, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक प्रशांत धोटे, अश्विनी वैद्य, उमेदचे प्रभाग समन्वयक रोशन लोधे, दिनेश टाले यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.