‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 05:26 PM2022-01-19T17:26:59+5:302022-01-19T17:54:43+5:30

एकदा विद्यार्थ्यांनी एखाद्या ‘फ्रँचायझी’बाबत ‘सर्च’ केले की वारंवार त्याच्या ‘सोशल’ खात्यांवर त्याचसंदर्भातील ‘पोस्ट’ दिसत असल्याने विद्यार्थीदेखील नकळत या अभ्यासक्रमांकडे खेचले जातात.

lots of offices are open Nagpur under the name of various educational company 'Franchise' | ‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये

‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये

googlenewsNext
ठळक मुद्देपरवानगी नसतानादेखील ऑनलाइन शिक्षणाचा बाजारविद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’चादेखील वापर

योगेश पांडे

नागपूर : विद्यापीठांची ‘फ्रँचायझी’ असल्याचा दावा करून विविध एज्युटेक कंपन्या, तसेच ॲपतर्फे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत असून, काहींनी नागपुरातदेखील कार्यालये थाटली आहेत. तेथूनच विद्यार्थ्यांची भलामण करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे सबकुछ ऑनलाइनच्या जमान्यात विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांतर्फे ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’चा वापर करण्यात येतो. एकदा विद्यार्थ्यांनी एखाद्या ‘फ्रँचायझी’बाबत ‘सर्च’ केले की वारंवार त्याच्या ‘सोशल’ खात्यांवर त्याचसंदर्भातील ‘पोस्ट’ दिसत असल्याने विद्यार्थीदेखील नकळत या अभ्यासक्रमांकडे खेचले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाला जोर आला असताना याचा गैरफायदा घेण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत; परंतु प्रत्यक्षात मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांना ‘फ्रँचायझी’च्या माध्यमातून दूरस्थ शिक्षण सुविधा देण्याची परवानगीच नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील स्पष्ट केले आहे. असे असतानादेखील देशातील अनेक शहरांत ‘फ्रँचायझी’चा बाजार थाटण्यात आला आहे. नागपुरातदेखील काही खाजगी कंपन्या व ‘ॲप’ने विविध विद्यापीठांची नावे समोर करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखविली आहेत.

अमूक विद्यापीठाची पदवी तुम्हाला मिळेल असा दावा केला जात असून, यातूनच विद्यार्थी त्यांच्या जाळ्यात फसत आहेत. अनेक ‘फ्रँचायझी’कडून ‘एजंट’देखील नेमण्यात आले असून, ‘ऑनलाइन’ प्रचार-प्रसारावरदेखील बराच भर देण्यात येत आहे. काही विशिष्ट ‘सोशल’ माध्यमे किंवा ‘ॲप’च्या माध्यमातून वारंवार विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर ‘फ्रँचायझी’बाबतच माहिती कशी काय येईल याची तजवीज करण्यात येते. एखादी गोष्ट वारंवार समोर येत असल्याने विद्यार्थीदेखील नकळतपणे त्या जाळ्यात अडकतात, असे चित्र आहे.

नागपुरातदेखील ‘एजंटस्’ अन् कार्यालये

‘फ्रँचायझी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुक्त व दूरस्थ शिक्षण देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या व ॲप्सची नागपुरातदेखील कार्यालये व एजंटस् आहेत. इतवारी, सक्करदरा, नंदनवन, धरमपेठ, इत्यादी ठिकाणी त्यांची कार्यालये असून, विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असतात. विविध कोचिंग क्लासेसशीदेखील ‘टायअप’ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘लर्नर सपोर्ट सेंटर’लादेखील परवानगी नाही

‘लर्नर सपोर्ट सेंटर’च्या नावाखालीदेखील कंपन्या व ॲपतर्फे विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होतो. मात्र, उच्च शिक्षण संस्थांना थेट अशी केंद्रे उघडण्याची परवानगी आहे. एखाद्या फ्रँचायझी किंवा आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून त्यांना ‘एलएससी’ स्थापन करता येत नाही, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: lots of offices are open Nagpur under the name of various educational company 'Franchise'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.