जगातील सर्वात कमी उंचीच्या ज्योतीचा योगाभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 07:57 PM2019-06-20T19:57:18+5:302019-06-20T20:00:21+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात कमी उंचीचा मान पटकावलेल्या ज्योती आमगे हिने सीए रोडवरील आंबेडकर गार्डन येथे योगाभ्यास करून जागतिक योग दिनाचा संदेश दिला. यावेळी तिच्या सोबत आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे ही सुद्धा सहभागी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात कमी उंचीचा मान पटकावलेल्या ज्योती आमगे हिने सीए रोडवरील आंबेडकर गार्डन येथे योगाभ्यास करून जागतिक योग दिनाचा संदेश दिला. यावेळी तिच्या सोबत आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे ही सुद्धा सहभागी झाली होती.
मन, शरीर, आत्मा, बुद्धी निरोगी ठेवण्यासाठी योग नियमित करणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर योगाला मान्यता मिळाली असल्याने भारत सरकार २१ जूनला योगदिन साजरा करीत आहे. मानवाच्या आरोग्यासाठी योग महत्त्वाचा असल्याने तो प्रतिदिन करावा, यासाठी ज्योती आमगे हिने योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगाभ्यास करून सर्वांनाच संदेश दिला. ज्योतीची उंची २ फूट ६ इंच आहे. तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. ज्योतीने बॉलिवूडच्या सिनेमातही काम केले आहे तर धनश्री सुद्धा आंतरराष्ट्रीय योगपटू असून, तिनेही नागपूरचे नाव सातासमुद्रापार पोहचविले आहे. धनश्रीने २०१३ पासून सलग एशियन योग चॅम्पियनशीप व वर्ल्ड योग चॅम्पियनशीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या दोघींनी एकत्र येऊन ‘करा योग, रहा निरोग’ असा संदेश दिला आहे.