लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोनागपूरच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच एका अॅपच्या माध्यमातून नागरिकांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशन किंवा फिडर सर्व्हिसेसचा लाभ घेता येणार आहे. नागपूर शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे.महामेट्रोच्या पुढाकाराने सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी संस्थांशी चर्चा करून ही संकल्पना प्रत्यक्षात कशी राबविता येईल, यावर विचारमंथन करण्यात येत आहे. राष्ट्रीय नागरी वाहतूक धोरणाप्रमाणे (एनयूटीपी) नागपूर शहरासाठी सर्व मेट्रो स्टेशनवरून सुविधाजनक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे व पर्यावरण संवर्धन करण्याच्या दिशेने महामेट्रो कार्य करीत आहे.वाहतुकीच्या सर्व घटकांची माहिती मिळणारमहामेट्रोच्या या प्रयत्नामुळे नागरिकांना केवळ एका अॅपच्या माध्यमातून मेट्रोसह सायकल, ई-रिक्षा, ई-स्कूटर, आॅटो-रिक्षा, टॅक्सी, बस व इतर सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणाºया वाहनातून प्रवास करता येणार आहे. या अॅपच्या माध्यमाने शहरातील वाहतुकीच्या विविध घटकासंबंधी महत्त्वाची माहिती सहज मिळू शकेल. तसेच यात वाहतुकीच्या या साधनांचा मार्ग, वेळापत्रक आणि नेमका प्रवास दर काय ही माहिती मिळू शकेल. जीपीएस प्रणालीच्या मदतीने जवळील वाहनांची माहिती मिळेल. कॉमन मोबिलिटी कार्डच्या साहाय्याने प्रवास भाडे चुकवणे देखील शक्य होईल.बैठकीत तज्ज्ञांचे मार्गदर्शनमेट्रो भवन येथे नुकतेच पार पडलेल्या एका बैठकीत ही संकल्पना प्रत्यक्षात कशी कार्य करेल, यावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीत महामेट्रो नागपूरचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, (ईडी व नियोजन) सुभाष सिंगला, रामनाथ सुब्रमण्यम (पुणे मेट्रोचे ईडी व नियोजन), महेश गुप्ता (जेजीएम-एमएमआय) यांनी प्रथम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यामागचा महामेट्रोचा दृष्टिकोन व त्याची उद्दिष्टे यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच फिडर सर्व्हिसेस माध्यमातून जास्तीत ज्यास्त नागरिकांना मेट्रोशी कसा जोडता येईल यावर तज्ज्ञांनी आपले बैठकीत मांडले.बैठकीत सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात अॅग्रिगेटर्स, आॅपरेटर्स आणि अप्लिकेशन डेव्हलपमेंट एजन्सीसह टाटा मोटर्स, अशोक लेलँड लिमिटेड, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेड, फोर्स मोटर्स लिमिटेड, शटल, पिनॅकल इंडस्ट्रीज, बाऊन्स (विकेट राईड अॅडव्हेंचर सर्व्हिसेस प्रा. लि.), बाजोरिया मोटर्स, मायट्रा एन ४ इलेक्ट्रिक प्रा. लि., चलो प्रा. लि., हंसा ट्रॅव्हल्स यांचा सहभाग होता.
महामेट्रो तयार करणार ‘आॅल इन वन अॅप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 1:38 AM
महामेट्रो नागपूरच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच एका अॅपच्या माध्यमातून नागरिकांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशन किंवा फिडर सर्व्हिसेसचा लाभ घेता येणार आहे. नागपूर शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे. महामेट्रोच्या पुढाकाराने सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी संस्थांशी चर्चा करून ही संकल्पना प्रत्यक्षात कशी राबविता येईल, यावर विचारमंथन करण्यात येत आहे. राष्ट्रीय नागरी वाहतूक धोरणाप्रमाणे (एनयूटीपी) नागपूर शहरासाठी सर्व मेट्रो स्टेशनवरून सुविधाजनक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे व पर्यावरण संवर्धन करण्याच्या दिशेने महामेट्रो कार्य करीत आहे.
ठळक मुद्दे देशातील पहिली अॅप बेस फिडर सेवा : नागरिकांना करता येणार सर्वत्र प्रवास