‘आमच्याकडे आता कार्यकर्त्यांना चहा द्यायलाही पैसा नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 09:29 AM2024-04-06T09:29:18+5:302024-04-06T09:31:14+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणुकीत कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही काँग्रेसकडे पैसा नाही. आमचा जनतेवर विश्वास आहे. जनता आम्हाला मदत करेल, जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
नागपूर : निवडणुकीत कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही काँग्रेसकडे पैसा नाही. आमचा जनतेवर विश्वास आहे. जनता आम्हाला मदत करेल, जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर येथे प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी चेन्नीथला शुक्रवारी नागपुरात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आघाडीत एकत्रितपणे काम करत असताना जागा एकमेकांना शेअर कराव्या लागतात. आमचे उमेदवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. सांगलीचा विषय आज किंवा उद्या सुटलेला असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वंचितशी शेवटपर्यंत चर्चेची तयारी : वासनिक
अ. भा. काँग्रेस समितीचे महासचिव यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत शेवटपर्यंत चर्चेची तयारी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, वंचितसोबत अनेक बैठक झाल्या. महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठीचर्चा झाली.माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.