लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची कंत्राटी सेवा रद्द करून त्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.महाराष्ट्र सुरक्षा दलाची निर्मिती २६/११ मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राम प्रधान समितीच्या शिफारशीनंतर करण्यात आलेली होती. शासकीय ठिकाणांवर या जवानांची नेमणूक करण्यात येत असून, महाराष्ट्र सुरक्षा दल हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अधीन असून, येथील जवानांना कंत्राटी पद्धतीने सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रति व्यक्ती २५ ते ३० हजार रुपये अशी उचल केली जाते, परंतु जवानांना केवळ १२ हजार रुपये मासिक पगार देण्यात येतो. यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झालेली आहे. राज्यामध्ये जवळपास ९,००० जवान याअंतर्गत सेवा देत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सुरक्षा महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाºया जवळपास ५०० जवानांची सेवा महामंडळाकडून समाप्त करण्यात आली होती. या विविध समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी खा. कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांना या निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना सेवेत कायम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:18 AM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची कंत्राटी सेवा रद्द करून त्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.महाराष्ट्र सुरक्षा दलाची निर्मिती २६/११ मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राम प्रधान समितीच्या शिफारशीनंतर करण्यात आलेली होती. शासकीय ठिकाणांवर या ...
ठळक मुद्देकृपाल तुमाने यांची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन