लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नंदनवन परिसरातील निर्मलनगरी कॉलनी येथे स्थानिक नागरिकांना गणेश उत्सवासाठी मंडप टाकण्यास रोखणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इतर आरोपींमध्ये नंदा दिनेश बांते, योगेश कनाडे, प्रफुल्ल मनोहर शेंडे (४२) रा. निर्मलनगरी, नीतेश इंगळे, शेख जाधव, अमित ठाकूर, आतिश ठाकूर, शुभम दुरुगकर, हरीश कदम आदींचा समावेश आहे. प्रफुल्ल करपे रा. निर्मलनरी असे फिर्यादीचे नाव आहे. करपे यांच्या तक्रारीनुसार, निर्मलनगरीत कही वर्षांपासून स्थानिक रहिवासी गणेश उत्सव साजरा करतात. यंदाही गणपती उत्सवाची तयारी सुरू होती. गेल्या बुधवारी ५ सप्टेंबर रोजी मंडप टाकण्याचे काम सुरू होते. तेव्हा प्रफुल्ल शेंडे आपल्या साथीदारासह आले आणि मंडपासाठी परवानगी आहे का म्हणून विचारणा केली तसेच वाद घातला. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आरोपी कॉलनीत आले आणि नागरिकांना धमकावणे सुरू केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरातील मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:59 AM
नंदनवन परिसरातील निर्मलनगरी कॉलनी येथे स्थानिक नागरिकांना गणेश उत्सवासाठी मंडप टाकण्यास रोखणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देनिर्मलनगरी कॉलनी : गणेश उत्सवाची तयारी रोखण्याचा आरोप