१३१ नागरिकांना दंड करून दिले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:06 AM2020-12-23T04:06:32+5:302020-12-23T04:06:32+5:30

मनपाच्या पथकाची कारवाई : आतापर्यंत १.८८ कोटी दंड वसूल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या ...

Masks fined 131 citizens | १३१ नागरिकांना दंड करून दिले मास्क

१३१ नागरिकांना दंड करून दिले मास्क

Next

मनपाच्या पथकाची कारवाई : आतापर्यंत १.८८ कोटी दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १३१ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ६५ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. या सर्वांना मास्क देण्यात आले. आतापर्यंत पथकांनी २४ हजार ८५९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी लाख ८८ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला.

नागरी भागात ‍विनामास्क नागरिक फिरताना दिसतात, ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाद्वारे अशा नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे, तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.

उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत १३, धरमपेठ ३०, हनुमाननगर ९, धंतोली ९, नेहरूनगर १३, गांधीबाग, सतरंजीपुरा १०, लकडगंज ७, आशीनगर १५, मंगळवारी १२ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात बेजबाबदार नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे.

Web Title: Masks fined 131 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.