लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाल्यात गडर लाईनचे पाणी सोडले जाते. नाल्यातील पाणी वाहून न जाता तुंबलेले असल्याने घाणीचा त्रास होतो. परिसरात डासांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. आजारांना सामोरे जावे लागते, अशी तक्रार बंधूनगर येथील नागरिकांनी केली. गणपतीनगर, अलंकार कॉलनी, काळे ले-आऊ ट, गोरेवाडा, मानकापूर, झिंगाबाई टाकळी परिसरात बहुसंख्य वस्त्यात नाल्या नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात पाणी तुंबते. लोकांच्या घरात शिरते. डासांचा त्रास कायमचाच आहे. तसेच स्च्छतेचा अभाव असल्याने आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या व्यथा नागरिकांनी मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्यापुढे मांडल्या.नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाला मंगळवारी झोनमधील प्रभाग क्रमांक १० व ११ पासून सुरुवात करण्यात आली. महापौरांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. बंधूनगरातील नागरिकांनी नाला कायम तुंबल्याने परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितले. अलंकारनगर भागातही अशीच परिस्थिती आहे. गिऱ्हे ले-आऊटमधील नागरिकांनी ड्रेनेजलाईनचा अभाव व नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने तो अरुंद झाला असून, पावसाळी पाणी अडून नागरिकांच्या घरात शिरत असल्याचे निदर्शनास आणले. गणपतीनगर काळे ले-आऊटमध्ये नागरिकांनी पाणी, स्वच्छता, मोकळ्या भूखंडांवर घरातील सांडपाणी आदी समस्यांबाबत संतापजनक प्रतिक्रिया महापौरांपुढे मांडल्या. संदीप जाधव यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी केली. नाल्याच्या स्वच्छतेची मागणी करतानाच येथील नागरिकांनी पाणी समस्येकडे लक्ष वेधले. प्रभाग क्रमांक १० मध्ये सूरजनगर, संगमनगर, गोरेवाड्यातील नागरिकांनी नळ नसल्याने पाणी समस्या मोठी असल्याचे सांगितले.नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील झोननिहाय, प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी, महत्त्वाच्या समस्यांवर, प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ३ डिसेंबर ते ११ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक सोमवारी झोननिहाय जनता दरबार घेणार आहेत. या जनता दरबाराची पूर्वतयारी म्हणून महापौरांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.यावेळी कर आकारणी व कर संकलन समिती सभापती संदीप जाधव, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नासुप्र विश्वस्त भूषण शिंगणे, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, नगरसेवक सुनील अग्रवाल, नरेश बरडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त विजय हुमणे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, विद्युत अधिकारी सालोडकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.घाण करणाऱ्यांवर कारवाई कराझिंगाबाई टाकळी परिसरात कचरा संकलन केंद्र कमी असल्याची नागरिकांची तक्रार होती. त्यावर बोलताना महापौरांनी नागरिकांनी ठरवून एक जागा सुचवावी, त्यावर संकलन केंद्र तयार करता येईल, असे आश्वासन दिले. दहा झोनसाठी दहा कचरा संकलन केंद्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. परिसरात असलेल्या नाल्यामध्ये कचरा व घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच नाल्यातील घाण स्वच्छ करून त्यातील झाडे -झुडपे काढून टाकून नदी प्रवाह मोकळे करण्यास सांगितले.कचरा असलेल्या भूखंडधारकांना नोटीसगिऱ्हे ले-आऊट परिसरामध्ये पावसाचे पाणी दोन - ते तीन दिवसपर्यंत साचून राहते, अशी नागरिकांची तक्रार होती. याशिवाय येथे मोकळे भूखंड मोठ्या प्रमाणावर आहेत. मोकळ्या भूखंडावर असलेली झाडे झुडपे त्वरित हटवावी, व ज्यांचे भूखंड आहे त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश महापौरांनी दिले. या ठिकाणी एक वाचनालय व्हावे, ही मागणी नागरिकांनी केली, यावर बोलताना महापौर यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचे सांगितले.मोकाट जनावरांचा त्रासपरिसरातील मोकाट जनावरांचा त्रास आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली. अंलकार सोसायटीमध्ये पथदिव्यांची मागणी नागरिकांनी केली. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार केली.आमच्या भागात नळाला पाणी येत नाही. पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी कधी-कधी विकत आणावे लागते.उषा नायडू, काळे ले-आऊटपरिसरात कचरा उचलणारी गाडी नियमित येत नाही. परिणामी नागरिक कचरा मोकळ्या भूखंडावर टाकतात. त्यामुळे दुर्गंधी वाढली आहे.अरुण चिखले, काळे ले-आऊट.
महापौर आपल्या दारी : नाल्यात घाण पाणी; डासांच्या त्रासातून सुटका करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 9:41 PM
नाल्यात गडर लाईनचे पाणी सोडले जाते. नाल्यातील पाणी वाहून न जाता तुंबलेले असल्याने घाणीचा त्रास होतो. परिसरात डासांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. आजारांना सामोरे जावे लागते, अशी तक्रार बंधूनगर येथील नागरिकांनी केली. गणपतीनगर, अलंकार कॉलनी, काळे ले-आऊ ट, गोरेवाडा, मानकापूर, झिंगाबाई टाकळी परिसरात बहुसंख्य वस्त्यात नाल्या नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात पाणी तुंबते. लोकांच्या घरात शिरते. डासांचा त्रास कायमचाच आहे. तसेच स्च्छतेचा अभाव असल्याने आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या व्यथा नागरिकांनी मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्यापुढे मांडल्या.
ठळक मुद्देप्रभाग १० व ११ मधील नागरिकांची मागणीमंगळवारी झोनमधील समस्या जाणून घेतल्या