ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मी टू’ चळवळीमुळे महिला अन्यायावर बोलायला पुढे आल्या आहेत. पण पुढे त्याचा निष्कर्श बदनामीशिवाय काहीच नाही. अन्यायग्रस्त महिला असो की सार्वजनिक जीवनात वावरणाºया, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, या भावनेतून सहयोग ट्रस्ट व ह्युमन राईट्स अॅण्ड लॉ डिफेंडर संघटनेतर्फे महिलांच्या सन्मानासाठी ‘वॉक फॉर रिस्पेक्ट’ आयोजन केले होते.ह्युमन राईट्स अॅण्ड लॉ डिफेंडरच्या समन्वयक अॅड. स्मिता सिंगलकर यांच्या नेतृत्वात आयोजित या रॅलीमध्ये महापौर नंदा जिचकार, ज्येष्ठ समाजसेविका सीमाताई साखरे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे, सुनीती देव, मतिमंदाचे प्रतिनिधित्व करणाºया अर्चना श्रावणे, माजी सैनिक महिला संघटनेच्या शीला टाले, लीना बेलखोडे, जयश्री पाठक, अरुणा फाले, स्वच्छ असोसिएशनच्या अनसूया काळे यांच्यासह पोलीस विभागातील महिला कर्मचारी व काही विदेशी महिलांसह शासकीय कर्मचारी व विविध क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या होत्या. महाराजबाग येथून निघालेल्या रॅलीत सहभागी महिलांच्या हातात सन्मान मिळावा, अशी मागणी करणारे फलक होते. यावेळी अॅड. स्मिता सिंगलकर म्हणाल्या की २०१४ मध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेल्या कायद्यात प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात अंतर्गत समिती नियुक्त करणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी ही समिती अस्तित्वातच नाही. जिथे आहे तिथे कार्यान्वित होणे गरजेचे आहे. यासंदर्भात रॅली संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.