कोरोना रुग्ण अन् नातेवाईकांच्या भोजनाची केली व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:45+5:302021-06-04T04:06:45+5:30
नागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक परिस्थितीअभावी बाहेरून भोजन विकत घेऊ शकत नाहीत. अशा ...
नागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक परिस्थितीअभावी बाहेरून भोजन विकत घेऊ शकत नाहीत. अशा गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एसटी कर्मचारी मागील महिनाभरापासून भोजनाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांची भाई की दुवाये ही संघटना मेडिकलमधील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ३ मेपासून दररोज भोजन पुरवित आहे. यामुळे मेडिकल परिसरात राहणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची सुविधा झाली आहे. संघटनेचे प्रशांत कामडे, प्रेम मुंदाफळे, श्रीधर तक्ताडे, संतोष चिचघरे, प्रशांत उमरेडकर, जगदीश पाटमासे, शेरु चिचघरे, सतीश तिवारी, निखिल पौनीकर, काशीनाथ उमरेडकर, सतीश सहारे, राजेश पाठणकर, राहुल डुब्बलवार, प्रकाश भनारकर, मिलिंद नरांजे, नितीन धामनकर, शैलेश पौनीकर हे भोजन वितरणाची जबाबदारी पार पाडत आहेत.
.........