कामठी : ड्रॅगन पॅलेस टेम्पल विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या स्थापना दिवसानिमित्त कामठी शहरातील ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये एकदिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते.
शिबिराचे उद्घाटन ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापिका तथा माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. सुलेखा कुंभारे व आचार्य डहाट यांनी मानवी आराेग्य व तणाव रहित जीवनात ध्यानाचे महत्त्व यावर विस्तृत मार्गदर्शन केले. राेगमुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने ध्यान करावे असे आवाहन ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केले. आचार्य डहाट यांनी ध्यान करण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या. शिबिराच्या यशस्वितेसाठी सुशील वानखेडे, सचिन नेवारे, विनय बांबोडे, रेखा भावे, वंदना आडे, शालू सावरकर, सुमन घरडे, चंद्रजित नागदेवे, भीमराव हाडके, चंदू कापसे, सुशील तायडे यांनी सहकार्य केले. शिबिरात माेठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले हाेते.