विदर्भ आंदोलनाच्या तयारीसाठी हिंगणात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:17+5:302021-07-20T04:07:17+5:30
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्टपासून नागपुरात होणाऱ्या ठिय्या आंदोलनाच्या तयारीसाठी हिंगणा तालुका कार्यकर्ता बैठक राम नेवले ...
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्टपासून नागपुरात होणाऱ्या ठिय्या आंदोलनाच्या तयारीसाठी हिंगणा तालुका कार्यकर्ता बैठक राम नेवले यांच्या उपस्थितीत रविवारी महाजनवाडी, वानाडोंगरी आणि हिंगणा येथे झाली.
नेवले म्हणाले, विदर्भाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपाने विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचे सरकार आता केंद्रात असल्याने त्यांनी विदर्भ राज्य द्यावे अन्यथा येथून जावे, यासाठी हे आंदोलन असेल, असे ते म्हणाले. नागपुरात होणाऱ्या बेमुदत ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी बैठकीत केले. जिल्हा उपाध्यक्ष गुलाब धांडे, नागपूर शहर दक्षिण - पश्चिम अध्यक्ष सचिन लोणकर यांनीही मार्गदर्शन केले. आयोजक अजय सिरसवार यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला अॅड. मनीषा खोंडे, संदीप खंडारे, सुधीर कडू, कमलेश सिंह, बट्टु हिरणवार, प्रमोद मलेवार, दीपक नासरे, रमेश निमजे, अजय सिरसवार, शुभम चौधरी, प्रकाश दवंडे, प्राची केदार, हंसदास शेंदरे आदी उपस्थित होते.